रक्तदान करण्याचे फायदे, आरोग्याच्या दृष्टीने ब्लड डोनेशन ठरते फायदेशीर कसे ते जाणून घ्या

एका ठराविक वयानंतर रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. अनेकदा ‘रक्तदान हे सर्वात मोठे दान’ असे सांगत रक्त डोनेट करण्यासाठी आवाहनही करण्यात येते. अनेकांना रक्तदानाचे महत्त्व अजूनही कळत नाही. रक्त मिळाल्याने दुसऱ्याचा जीव वाचतोच पण स्वतःच्या आरोग्यालाही रक्तदान केल्यामुळे फायदा मिळतो.

Blood Donation म्हणून इंग्रजीत याला अधिक ओळख आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून ते ६५ व्या वर्षापर्यंत रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार केवळ ३७ टक्के लोकच भारतात रक्तदान करतात. बऱ्याच लोकांना याबाबत फायद्यांची माहितीच नाही. रक्तदानाचा नक्की काय फायदा होतो ते घ्या जाणून. (फोटो सौजन्य – iStock)

​वजन कमी करण्यास होते मदत​

​वजन कमी करण्यास होते मदत​

तुमचे वजन जास्त वाढले असेल तर रक्तदान करण्याने यामध्ये फरक पडतो. अर्थात वजन कमी करणे हे मुख्य नियमांमध्ये बसत नाही. पण रक्तदान केल्याने वजन कमी करण्यासह सहनशक्तीही वाढते. ब्लड सेल्सने अधिक उत्पादन होऊन आरोग्याला फायदा मिळतो.

हेही वाचा :  या खास चटणीने करा युरिक अ‍ॅसिडची समस्या दूर

​रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मिळतो फायदा​

​रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मिळतो फायदा​

पूर्ण शारीरिक आरोग्यासाठी रक्तदान फायदेशीर ठरते. रक्तदान केल्यानंतर रक्तातील प्लाज्मामध्ये ल्युकोसाईट्सची वृद्धी होते. ल्युकोसाईट्स आपल्या प्रतिकारशक्तीसाठी कार्यरत असतात. कोणत्याही गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती योग्य असणे गरजेचे आहे.

(वाचा – या कडू पदार्थापासून तयार केलेला हर्बल चहा, नसांमधून कोलेस्ट्रॉल करेल गायब)

​हृदयरोगाचा धोका होतो कमी​

​हृदयरोगाचा धोका होतो कमी​

नियमित रक्तदान केल्याने शरीरातील Iron Level नियंत्रित राहाते. रक्तातील लोहाचे प्रमाण अधिक असेल तर नसांना ब्लॉक करते आणि यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही. यामुळेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. तसंच हेमोक्रोमॅटोसिस आजारही होऊ शकतो. रक्तदान केल्याने हृदयापर्यंत रक्तप्रवाह योग्य राहून हृदयरोगाचा धोका राहात नाही.

(वाचा – ५ गोष्टींचा कराल वापर तर त्वरीत कोसळेल कोलेस्ट्रॉल, घरच्या घरी मिळेल उत्तम रिझल्ट)

​कॅन्सरचा धोका कमी​

​कॅन्सरचा धोका कमी​

रक्तात लोह अधिक प्रमाणात झाल्यास रक्तदान हा लोह कमी करण्याचा चांगला पर्याय आहे. म्हणजेच रक्तात लोह अधिक प्रमाणात साठू नये म्हणून रक्तदान करावे. रक्तात लोह जमा झाल्यास, ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो. कॅन्सरपासून लांब राहायचे असेल तर रक्तदान नियमित करावे.

हेही वाचा :  Nitin Gadkari : ''काम व्यवस्थित करत नसलेल्या...'' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणाचे टोचले कान?

(वाचा -‘Period Panty’ मासिक पाळीत वापरण्याचं प्रमाण का वाढलंय, कसा करावा वापर जाणून घेणे गरजेचे)

​मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर​

​मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर​

रक्तदानाचे शारीरिक अनेक फायदे आहेत, मात्र मानसिक फायदा अधिक आहे. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा तुम्हाला एक वेगळीच सुखद अनुभूती येते. आपल्या रक्तामुळे कोणाचे तरी प्राण वाचले आहेत ही भावनाच तुम्हाला आनंद देऊन जाते. हाच आनंद तुमच्या मानसिक स्थितीला संतुलित राखण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आणि रक्तदान करून तुम्ही अधिक मानसिकदृष्ट्या सक्षम होता.

टीप – रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला कोणतेही आजार असतील तर रक्तदान करू नका. तसंच डॉक्टरांकडून पूर्ण माहिती घेतल्यानंतरच रक्तदान करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …