Weight Loss: आहारात समाविष्ट करा हिरवे चणे आणि घटवा पटापट वजन

हिवाळ्यात अनेक ठिकाणी पोपटी बनवली जाते आणि यामध्ये सर्वाधिक वापरली जाणारी भाजी म्हणजे हिरवा चणे. हिवाळ्यात या भाजीला जास्त मागणी असते. बरेचदा हिरवे चणे घोड्याला खायला देतात असं म्हणतात. मात्र असं अजिबात नाही. माणसाच्या शरीरासाठीही हिरवे चणे अत्यंत फायदेशीर ठरतात. हिरव्या चण्याचे नक्की फायदे काय आहेत आणि यामुळे वजन कशा पद्धतीने कमी होते हे या लेखातून जाणून घेऊया. मुळात वजन कमी होण्यासाठी याची कशी मदत होते ते पाहूया. न्यूट्रिशनिस्ट लोवोनीत बत्रा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून याची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Freepik.com, Canva)

​हिरव्या चण्यातील पोषक तत्व​

​हिरव्या चण्यातील पोषक तत्व​

Nutritional Value Of Green Chickpeas:हिरवे चणे अथवा ज्याला छोलिया बीन्स नावाने ओळखण्यात येते ते पोषक तत्वांनी युक्त आहे. यामध्ये फायबर, प्रोटीन, विटामिन आणि खनिजे यांचा चांगला स्रोत आहे. अर्धा कप चण्यात साधारतः ३६४ कॅलरी, १९.३ ग्रॅम प्रोटीन, १७.६ ग्रॅम आहार फायबर, ६ ग्रॅम वसा आणि १० ग्रॅम नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते. तुम्ही जर अन्य कडधान्यासह याची तुलना केली तर यामध्ये अधिक पोषक तत्व असल्याचे तुम्हाला लक्षात येईल. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी हिरव्या चण्यांना आजकाल सुपरफूड्समध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे.

हेही वाचा :  Nashik Crime : 'मी याला माझ्या पद्धतीने समजावतो...', मुख्याध्यापकाने व्यसनी मेहुण्याला कायमचं केलं शांत

​वजन कमी करण्यासाठी हिरव्या चण्याचे फायदे​

​वजन कमी करण्यासाठी हिरव्या चण्याचे फायदे​

Benefits Of Green Chickpeas For Weight Loss: हिरव्या चण्याला फायबरचे पॉवरहाऊस म्हणूनही ओळखले जाते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन कमी करण्यासाठी अधिक चांगली मदत मिळते आणि वजन पटापट कमी होण्यास फायदा मिळतो. कारण यातील पोषक तत्व खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहाते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे सतत खाणे पोटात जात नाही आणि वजन कमी व्हायला सुरूवात होते.

(वाचा – Weight Loss: शरीराने असे ५ संकेत दिले तर समजा तुम्हाला त्वरीत वजन कमी करण्याची आहे गरज, वेळीच व्हा सावध)

​शरीराला फोलेट मिळते​

​शरीराला फोलेट मिळते​

हिरवे चणे खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात फोलेट मिळते. हिरव्या चण्यात विटामिन बी९ अथवा फोलेट असल्यामुळे चिंता, मूड स्विंग्ज आणि नैराश्यासारख्या समस्या दूर राखण्यास मदत मिळते. हिरव्या चण्याची भाजीही करता येते. ही तुम्ही आहारात समाविष्ट करून घ्या.

(वाचा – सकाळीच रिकाम्या पोटी कॉफी पिता का? जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी)

​कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत​

​कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत​

तुम्ही तुमच्या आहारात या पौष्टिक हिरव्या चण्याचा समावेश करून घेतलात तर कोलोरेक्टल कॅन्सरच्या त्रासापासून दूर राहण्यास मदत मिळते. यातील पोषक तत्वे कोलोरेक्टल कॅन्सरची जोखीम कमी करण्यास मदत करतात.

हेही वाचा :  लग्नाचा दिवस जवळ येताच धाकधुक वाढली आहे? मग अशा प्रकारे दुर करा अस्वस्थता जाणून घ्या नक्की काय आहे Pre-Wedding Anxiety

​हृदयरोगापासून राहाल दूर​

​हृदयरोगापासून राहाल दूर​

हिरव्या चण्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात मिळते, जे रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरते. Blood Pressure नियंत्रित राहण्यासाठी हृदयाचे काम व्यवस्थित असावे लागते. हिरव्या चण्यातील प्लांट स्टेरॉल सिटेस्टेरॉल पण असते जे वाईट कोलेस्ट्रॉल रोखण्यास मदत करते.

(वाचा -रोज सकाळी उठून उपाशीपोटी खा केवळ २ भिजवलेले अंजीर, फायदे ऐकून व्हाल हैराण)

​केसांसाठी उपयोगी​

​केसांसाठी उपयोगी​

केसांचे आतून पोषण करण्यासाठी हिरव्या चण्याचा वापर करून घेऊ शकता. हिरवे चणे खाल्ल्याने केसांना चांगले प्रोटीन मिळते आणि केस तुटणे, केसगळती आणि केस पातळ होणे अशा समस्यांपासून दूर राहाता येते.

​काय आहे हिरव्या चण्याचे अन्य फायदे​

​काय आहे हिरव्या चण्याचे अन्य फायदे​

Benefits Of Hara Chana: तुम्ही वनस्पतीजन्य शाकाहार घेत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात नक्की हिरव्या चण्यांचा वापर करून घ्यावा. हिरवे चणे हे सुपरहेल्दी मानले जात असून आरोग्याला अनेक लाभ मिळवून देतात.

  • पचनशक्तीमध्ये सुधारणा करणे
  • रक्तातील साखर नियंत्रणात आणणे
  • कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो
  • शरीराला दिवसभर आवश्यक असणारे अमिनो अ‍ॅसिड पुरविण्याचे काम करते

​आहारात हिरवे चणे कसे कराल समाविष्ट​

​आहारात हिरवे चणे कसे कराल समाविष्ट​
  • हिरवे चणे भाजून तुम्ही स्नॅक्समध्ये खाऊ शकता
  • याशिवाय तुम्ही उकडलेले बटाटे वा सोया चंक्ससह मिक्स करून खावे
  • नाश्त्यामध्ये याचा समावेश करायचा असेल तर १० मिनिट्स हिरवे चणे उकडवा त्यावर मीठ, चाट मसाला, लिंबू रस घाला आणि खायला घ्या
हेही वाचा :  कोरफडचा वापर करून केस होतील घनदाट, फक्त वापरण्याची योग्य पद्धत माहीत हवी

तुम्हीही तुमच्या आहारात हिरव्या चण्याचा समावेश करून नक्की घ्या. हे खाल्ल्याने नक्कीच चांगले परिणाम होतील. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या न्यूट्रिशनिस्टकडून याचे फायदे समजून घेऊ शकता.
अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक कराmaharashtratimes.com​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …