बिचारा गप आपलं काम करत होता, डान्सरने डिवचलं अन् त्यानं केली ‘बोलती बंद’, पाहा VIDEO

Security Guard Dance Video:  सोशल मीडियावर एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्याचं सर्वांनाच आकर्षण असतं. सोशल मीडियावर (Social Media Viral Video) अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ सर्वांचं मन जिंकून घेतात. तर काही व्हिडीओ नवनवीन गोष्टी शिकवतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. भर स्टेडियमवर उभा असलेल्या एका सिक्युरिटी गार्डचा हा व्हिडीओ अनेकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केलाय.

व्हिडिओमध्ये एक सुरक्षा रक्षक (Security Guard Dance Video) चीअरलीडर्समध्ये अप्रतिम डान्स करताना दिसतोय. सिक्युरिटी गार्डच्या डान्ससमोर डान्सर्स मुलीही फिक्क्या पडताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय झालं ते पाहूया…

झालं असं की… स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. पाय ठेवायला जागा नाही. रंगारंग कार्यक्रम सुरू होते. मोठ्मोठे डान्स कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी काही डान्सरला देखील बोलवण्यात आलं. आयोजकांनी पुर्ण सुरक्षा व्यवस्था तयार ठेवली होती. सेक्यूरिटी एकदम टकाटक… अशातच एक घटना घडली.

आणखी वाचा- Imran Khan : गुरू इम्रान खान यांच्यावर गोळीबार, शोएब अख्तरला संताप अनावर, Video शेअर करत म्हणाला…

हेही वाचा :  उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; 'कलंक' टिकेवरुन फडणवीसांचं टीकास्त्र, म्हणाले "फारच विपरित..."

डान्सचा कार्यक्रम (Dance festival) सुरू असताना काही डान्सर्स नाचत होत्या. त्यावेळी तिथं उपस्थित असलेला एक सेक्युरिटी गार्ड त्याठिकाणी तिथं गप् आपलं काम करत होता. सर्वांवर बारिक नजर ठेवत होता. त्यावेळी मागून येणाऱ्या एका डान्सरचा धक्का सेक्यूरिटी गार्डला लागला. मात्र, पठ्ठ्या आपल्या जागेवरून सरकायला तयार नाही. त्यावेळी आयोजकाने तिथं येऊन सिक्युरिटी गार्डला ठणकावलं. जणू काही त्यानं बाजूला हो नाहीतर डान्स कर, असा सल्ला दिला.

पाहा व्हिडीओ- 

आयोजकांची गोष्ट मनावर घेऊन सिक्युरिटी गार्ड (Security Guard Dance) मनमोकळा नाचला. सर्वासमोर त्याने आपला डान्स दाखवत आग लावली. डान्सर्सच्या नाकावर टिचून त्याने आपली कला सादर केली. त्यामुळे स्टेडियमवर एकच कल्ला झाला. अनेकांनी या सिक्युरिटी गार्डचं कौतूक केलंय तर अनेकांनी डान्स पुर्वनियोजित होता, असं म्हटलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही ठरवू शकता. मात्र, हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालेला दिसत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …