IND Vs WI, 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डनवर (Eden Gardens) 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. दरम्यान, तिसऱ्या टी-20 मालिकेतून विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आलीय. तसेच त्याला श्रीलंका मालिकेपूर्वी बायो बबलमधून ब्रेक देण्यात आल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलीय. विराट कोहलीच्या जागेवर भारताचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संघात स्थान मिळण्याची शक्यता

भारताला कोलकात्याच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना खेळायचा आहे. मात्र, या सामन्यात विराट कोहली खेळणार नाही. कोहलीला श्रीलंका मालिकेपूर्वी बायो बबलमधून ब्रेक देण्यात आलाय, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलीय. विराट कोहलीनं वेस्ट इंडीजद विरुद्ध तीन सामन्याची एकदिवसीय मालिका आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत.

ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता

विराट कोहलीच्या जागेवर ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाड फॉर्ममध्ये आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्यानं आपली छाप सोडलीय. महत्वाचं म्हणजे, ऋतुराज गायकवाडनं केवळ दोनच आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 125 च्या सरासरीनं त्यानं 35 धावा केल्या आहेत. 21 ही त्याची टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक स्कोर आहे.

चेन्नईला आयपीएलचं खिताब जिंकवलंय
ऋतुराज गायकवाडनं आयपीएलच्या मागच्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यानं स्वबळावर चेन्नईच्या संघाला चॅम्पियन बनवलं आहे. त्यानं आयपीएलच्या मागच्या हंगामात चेन्नईच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. ज्यामुळं देशभर त्याची चर्चा होती. चेन्नईकडून खेळताना त्यानं 16 सामन्यात 636 धावा केल्या आहेत. त्याच्या सर्वोकृष्ट खेळीमुळं चेन्नईच्या संघानं त्याला रिटेन केलंय.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन
ऋतुराज गायकवाडनं आपल्या खेळीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकल्यानंतर त्यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग चार शतके झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. सुरुवातीला संयमी फलंदाजी करायची आणि गेम पुढे चालवायची. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करायची, अशी ऋतुराज गायकवाडची शैली बनली आहे.

हे देखील वाचा-

अंडर 19 विश्वचषकाचा स्टार राजवर्धन हंगरगेकरवर वय लपवल्याचा आरोप, क्रीडा आयुक्तांचे बीसीसीआयला पत्र

Virat Kohli : वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या टी20 मध्ये विराट दिसला धमाकेदार फॉर्ममध्ये, सांगितलं ‘या’ खेळीमागचं कारण

IND vs WI, 2nd T20: रोमहर्षक सामन्यात भारत 8 धावांनी विजयी, मालिकेतही विजयी आघाडी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]