अवतार : द वे ऑफ वॉटर

Avatar 2 Review : आपण सगळे मनाच्या गाभाऱ्यात कित्तेक वर्षांपासूनच्या मॅजिकल मास्टरपीस ठरलेल्या ‘अवतार’ चित्रपटाच्या सिक्वेलची वाट बघत होतो.  येणाऱ्या सिनेमाची लागलेली उत्कंठा, सिनेमा का पाहावा? अवतार (Avatar) ने काय दिलं हे थोडक्यात जाणून घेऊयात… 

हा सिनेमा श्वास रोखून समुद्री सफर कशी करावी हे आपोआपच शिकवेल. तेरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अवतार (Avatar)ची तुलना याच सिनेमाचा सीक्वल् Avatar The Way of Water सोबत होणं स्वाभाविक होतंच. जशी बाहुबलीची चित्रपटाची त्याच्या सीक्वलसोबत तुलना झालेली तशीच काहीसं अवतारसोबत घडत आहे. 

अवतारचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. कदाचित अवतारचं नवं युनिव्हर्स दिग्दर्शक जेम्स् कॅमेरॉन  (James Cameron) आगामी सिनेमाच्या सिरीज मधून घेऊन येतील, अशा  चर्चा रंगलेल्या आहेतच मात्र अवतारची मालिका मल्टिव्हर्सकडे वळेल का ते पाहायला आपण सगळे उत्सुक आहोत.  मात्र पहिल्या अवतारचा प्लॉट जिथं संपतो तिथूनच ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ चा स्क्रिनप्ले सुरू होतो. अवतार आपलाच रेकॉर्ड तोडेल का हा प्रश्न बिनबुडाचा वाटतो कारण अवतार हा सिनेमा स्वतःच एक रेकॉर्ड आहे,  खरंतर अवतारचा दुसरा भाग सिनेमा यायला तब्बल तेरा वर्षांची वाट पाहावी लागली हे खरंय…

न भूतो न भविष्यती, याची देही याची डोळा, अक्षरशः डोळ्यांची पारणे फेडणारे Spectacular Stunning Beautiful Visuals cinematic Experience हे सगळं पडद्यावर पाहताना अद्भुत दुनियेशी आपली नाळ जोडली जाते, अविस्मरणीय अनुभूती मिळते आणि या दुनियेचा आपणही भाग असावं एवढं वेड या सिनेमाने लावलंय.

हेही वाचा :  'दृश्यम 2' नं दुसऱ्या दिवशी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

News Reels

2022 ची सुरुवात एसएस राजमामौलींच्या RRR ने झाली  तर वर्षाचा शेवट हा जेम्स कॅमेरॉन यांच्या  अवतार या चित्रपटानं झाला. जवळपास पहिल्या अवतार सारखीच मिळती जुळती गोष्ट बऱ्याच Science fiction सिनेमात पाहायला मिळालेली. ट्रान्सफॉर्मर, पॅसिफिक रिम सोबतच How to Train your Dragon सारखा Animated सिनेमा प्रेक्षकांच्या मनात उतरलेला होता.पण अवतार 2 चा क्लायमॅक्स सीन हा टायटॅनिक सारखा असल्यासारखा वाटला. 

‘अवतार’ म्हणजे काय? 
तुम्ही पहिला अवतार पाहिलेला नसेल तर अजिबातच टेन्शन घ्यायची गरज नाहीये.  अवतार- 2 हा आधीच्या सिनेमाची कथा पुढे घेऊन जातोय तरी थोडंसं मागे डोकावून बघूया. पहिला अवतार हा 2009 मध्ये भेटीला आलेला.तेव्हाचं पृथ्वीवरील जीवन जवळपास 2145 वर्ष पुढंचं दाखवलं होतं. तेव्हा सगळं हायटेक जीवनमान होतं. पृथ्वी वरून कोणत्याही ग्रहावर येणं-जाणं, खानपान सगळं एकदम सोप्पं होतं आणि हेच लालची पृथ्वीवासी  प्लॅनेट ‘पॅन्डोरा’ वरून एक महागडा मौल्यवान खनिज (Unoptenium) मिळवण्यासाठी खुरापात्या करत असतात. ‘पॅन्डोरा’ चं जग किती गूढ संकल्पेत विस्तृत दाखवण्यासाठी दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी प्रचंड मेहनत घेतलेली दिसते, पॅन्डोराचं जंगल, जैविक विविधता,  वेगवेगळे प्राणी या सगळ्यांचं कनेक्शन दाखवलं होतं. यासाठी किती खर्च आला, किती वेळ लागला हे लक्षात येऊ शकतं.

‘नावी’ आणि माणसांचा DNA मिळवून अगदी हुबेहूब नावी प्रजाती साखरे क्लोन तयार करतात आणि त्यांना नाव ‘अवतार’  दिलं जातं. पृथ्वीवरील ठराविक सैनिकांचं मन हे टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून त्या अवतार मध्ये ट्रान्स्फर करून या अवतारांना पॅन्डोराच्या नावी लोकांमध्ये मिसळून तिथली सगळी माहिती वैज्ञानिकांना द्यायला मदत हे अवतार करत असतात.  यातच कथेचा नायक ठरलेला जेक सुली (Sam Wothington)  हा नौसेनेचा अपंग सैनिक असतो मात्र त्याला अवतार च्या रुपात  ट्रान्सफॉर्म केल्यावर त्याला आनंद होतो कारण त्याला चालता पळता येऊ लागतं,  जेक सुली जेव्हा पॅन्डोरा वर रिसर्चला फिरत असतो. जेक हा नावींच्या दुनियेत रममाण होऊन जातो,  पॅन्डोरा च्या प्रेमात पडतो, जेक मानवी जीवन सोडून तिथला ‘नावी’ होयचा निर्णय घेतो. नंतर तो पृथ्वीवरील लालची लोकांशी नावींच्या सोबत लढाई करतो, यातच कर्नलचा (Stephen Lang) न्येतिरीकडून खात्मा होतो असा पहिला अवतार आपण सिनेमागृहात पाहिला होता. 

हेही वाचा :  प्रियांका अन् दीपिकानंतर आता आलियाची हॉलिवूड वारी; 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये साकारणार प्रमुख भूमिका

कसा आहे द वे ऑफ वॉटर
सिनेमा नातेसंबंध उलगडतो, सिनेमा एकत्र कुटुंब पद्धतीवर भाष्य करतो, तेरा वर्षात तयार झालेला तीन तासांचा लांबलचक सिनेमा बघताना एकही मिनिट पडद्यावरची नजर हटत नाही. सिनेमाचा प्लॉट तीन भागात असलेला लक्षात येतो.   कथेत हिरव्यागार पॅन्डोराचा जंगलवासी जेक हा नावींच्या समूहाचा प्रमुख आहे, नावींच्या रक्षणाची जबाबदारी जेक वर आहे. जेकला तीन मुलं असल्याचं पाहायला मिळतं. पहिला न्येयतामृ, तिसरा लोअक तर सर्वात लहान मुलगा टुक. शिवाय आजून एक दत्तक मुलगी किरी आणि  मानव असलेला ‘स्पायडर’  असं जेकचं कुटुंब पाहायला मिळतं.  स्पायडर आणि किरी कोण आहेत? हे ज्यांनी जुना अवतार पाहिला त्यांना लक्षात येईलच….

पॅन्डोरा जेकला शोधत येतं आणि जेक सुली (Sam Wothington) या सगळ्यातून आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी महाकाय टूलकुन (Tulkun) माशांसोबत आत्मीय जिव्हाळा असणाऱ्या मेटकायीनवासीयच्या मुख्य टोनोवरी म्हणजेच (Cliff Curtis), आणि त्याची राणी रॉनलकडे आश्रयास जातात.

ज्याप्रमाणे जेकचं जंगल हे गूढ होतं तसंच हे समुद्र किनारी राहणारे  मेटकायीन लोकं तिथलं राहणीमान कसं असतं? हे शिकवतात असं सगळं जंगल टू समुद्र असा प्रवास, 3D गॉगल्स लावून  पाहायला खूप खरोखर वाटतं. मग हवेतल्या जेक आणि त्याच्या परिवाराच्या माकडउड्या ते त्यांनी समुद्रात खोल मारलेली सूर, पाण्यातल्या प्राण्यांशी जोडलेलं नातं, जेक चा परिवार आणि मेटकायीन च्या मुख्या सोबत झालेले मैत्रीसंबंध फुलत जातात.

हेही वाचा :  Kantara On OTT : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' आता ओटीटीवर!

इकडे सिदेखील ज्या प्रकारे जेक हा ‘स्पायडर’ च्या मदतीने आकाशवासीय सैनिक जे नावींच्या रुपात सगळं शिकून घेतात आणि पॅन्डोरा वरती महाकाय टूलकुन माश्यांची (Tulkun) शिकार करणाऱ्या आकाशवासीय सैनिकांच्या सोबतीने शोध घेत जेक पर्यंत पोहोचतात.  जेक-सलीला आपल्या परिवारात काय गमवावं लागतं, एक कुटुंब प्रमुख वडील हे नाते आपल्या मुलांना तो कसं जपतो. पुढं जे काही होतं ते पाहायला सिनेमगृहात नक्की जायला हवं.

सिनेमाचा बॅकग्राऊंड स्कोर एकदम खास आहे, अंडर वॉटर लोकेशन्स, थ्रिलिंग सीन्स, हे खूप चांगले आहेत.  सिनेमा 3D मध्ये सिनेमगृहात जाऊन फॅमिली सोबत पाहायला हवाच. ‘अवतार’ ला मी देतोय 4 स्टार!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …