अनुष्का शर्माचा भाऊ ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट?

Tripti Dimri-Karnesh Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) भाऊ  कर्णेश शर्मा (Karnesh Sharma) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कर्णेश शर्मा हा  एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर सध्या कर्णेश आणि एका अभिनेत्रीच्या डेटिंगच्या चर्चा होत आहेत. जाणून घेऊयात त्या अभिनेत्रीबद्दल…

कर्णेश शर्मा हा अभिनेत्री तृप्ती डिमरीला (Tripti Dimri) डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. नुकताच  तृप्ती आणि कर्णेश शर्मा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये  तृप्ती आणि कर्णेश यांचा रोमँटिक अंदाज दिसला. चित्रपट निर्माता सौरभ मल्होत्रानं हा फोटो काढला होता. फोटोवर हार्टचे इमोजी देखील दिसत आहे. तृप्ती आणि कर्णेश यांचा हा फोटो सध्या  व्हायरल होत आहे. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तृप्ती आणि कर्णेश यांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

पाहा फोटो: 

live reels
News Reels

तृप्तीचे चित्रपट

तृप्तीच्या ‘बुलबुल’ चित्रपटाची तसेच तिच्या काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झालेल्या कला चित्रपटाची निर्मिती कर्णेश शर्मानं केली. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या पोस्टर बॉइज या चित्रपटामधून तृप्तीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘बुलबुल’  या चित्रपटामुळे तृप्तीला विशेष लोकप्रियता मिळाली. ‘बुलबुल’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच कर्णेश आणि तृप्तीची ओळख झाली, अशी चर्चा आहे. 

हेही वाचा :  Sagar Karande : विनोदवीर सागर कारंडेचा 'चला हवा येऊ द्या'ला रामराम

तृप्ती ही सध्या तिच्या कला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता तृप्ती आणि कर्णेश यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’च्या घरातील प्रसाद जवादेचा प्रवास संपला; मांजरेकर म्हणाले,”यंदाच्या पर्वातील सर्वात मोठा धक्का”



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …