‘चकदा एक्सप्रेस’साठी जोरदार तयारी, अनुष्का शर्मा क्रिकेटच्या मैदानावर गाळतेय घाम!

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच क्रिकेटरच्या रुपात रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांचा बायोपिक ‘ChakdaXpress’मध्ये अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनुष्का शर्माने या चित्रपटाची तयारी सुरू केली असून, ट्रेनिंगचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा क्रिकेट पीचवर घाम गाळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का जोरदार ट्रेनिंग करताना दिसत आहे.

अनुष्का शर्माने व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, ‘गेट-स्वेट-गो! #ChakdaXpress ची तयारी दिवसेंदिवस कठीण होत आहे आणि प्रत्येक दिवस मोजावा लागतोय.’ या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे.

पाहा व्हिडीओ :

अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ पाहून चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. अनुष्काचे चाहते तिच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

अनुष्का शर्मा शेवट शाहरुख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात कतरिना कैफही मुख्य भूमिकेत होती. ‘झिरो’नंतर अनुष्काने कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही. ती चित्रपट आणि वेब सिरीजची निर्मिती करत होती. तिने ‘पाताल लोक’ या वेब सिरीज आणि ‘बुलबुल’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता सर्वांनाच अनुष्काच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा :  Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …