मनोरंजन आणि राजकारण यांचं नातं फारच खास आणि तितकंच जुनं आहे. अनेक कलाकार राजकारणात हात अजमावताना दिसून येतात. अशातच त्यांचं विविध राजकरण्यांसोबत चांगलं सूत जुळलेलं पाहायला मिळतं. अशातच गांधी घरण्याबाबत सांगायचं झालं, तर त्यांचं बच्चन कुटुंबाशी सुरुवातीपासूनच फार घनिष्ठ नातं होतं. सध्या अनेक लोकांना माहिती नसेल, पण अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी हे बालपणापासूनचे मित्र आहेत. त्यांची मैत्री जगजाहीर होती. इतकंच नव्हे तर राजीव गांधी शिक्षणासाठी विदेशात असताना तिथून ते अमिताभ यांच्यासाठी पत्र लिहत असत.
राजीव गांधी अमिताभ बच्चन यांच्या घट्ट मैत्रीचा एक किस्सा आज आपण पाहणार आहोत. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे एक अतिशय लोकप्रिय कवी होते. त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यादरम्यानचा हा किस्सा आहे. जेव्हा हरिवंशराय बच्चन यांना पुरस्कार दिला जाणार होता, तेव्हा संपूर्ण बच्चन कुटुंबाला त्यांच्या सोबत उपस्थित राहण्याची इच्छा होती. परंतु त्यावेळी फक्त दोनच लोकांना सोबत घेऊन जाता येणार होतं. अशातच अमिताभ बच्चन आणि त्यांचा भाऊ अजिताभ बच्चन यांना सोबत घेऊन जायचं निश्चित झालं. परंतु ऐनवेळी अजिताभ यांची तब्येत बिघडली. त्यामुळे फक्त बिग बी आपल्या वडिलांसोबत पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना झाले.

(हे वाचा: KBC सुरू असताना मोठी बातमी; अमिताभ बच्चन यांनी रात्री उशिरा ट्विट करून दिली हेल्थ अपडेट )
मुख्य सोहळ्याच्या आधी अमिताभ बच्चन तयार होत होते. परंतु त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं कि हे कपडे आपल्या मापाचे नाहीत. वास्तविक अजिताभ यांचे कपडे बॅगेतून काढण्याऐवजी अमिताभ यांचे कपडे काढून घरी ठेवण्यात आले होते. अशावेळी अमिताभ यांना आपले खास मित्र असणाऱ्या राजीव गांधी यांची आठवण झाली. त्यांनी सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. आणि त्यांच्याकडून त्यांचे कपडे मागवून घेतले. यावेळी राजीव गांधींनी आपला कुर्ता-पायजमा आणि शॉल पाठवून दिली होती. हेच कपडे परिधान करुन अमिताभ बच्चन पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. अशाप्रकारे हा रंजक किस्सा वाचून अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांच्यातील नातं किती घट्ट होतं याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या