वयाच्या 80 व्या वर्षांत Amitabh Bachchan यांना शूटिंगदरम्यान दुखापत

बॉलिवूडचे माहानायक अमिताभ बच्चन सतत चर्चेत असतात. आज सकाळी अमिताभ बच्चन यांच्या संदर्भात एक वाईट बातमी चाहत्यांना ऐकायला मिळाली. ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटासाठी हैदराबादमध्ये शूटिंग करत होते. एक अॅक्शन सीन शूट करताना, त्याच्या उजव्या बरगडीला दुखापत झाली. यावेळी त्यांना हालचाल आणि श्वास घेताना वेदना होत होती. वयाच्या या उंबरठ्यावर शरीरातील जखमा बऱ्या व्हायला खूप वेळ लागतो. पण शुटिंगच्या दरम्यान आपघात होण्याची अमिताभ यांची ही पहिली वेळी नाही. (फोटो सौजन्य :- @amitabhbachchan, istock)

कुली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती दुखापत

कुली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती दुखापत

1982 मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका फाईट सीनच्या दरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. हा अपघात एवढा मोठा होता की त्याचा जीव वाचला. ही चिंतेची बाब आहे की, ती दुखापत त्यावेळी बरी झाली असती, पण त्याच्याशी संबंधित अनेक तक्रारी आजही त्याला त्रास देतात.

हिपॅटायटीस बी आणि यकृत सिरोसिस

हिपॅटायटीस बी आणि यकृत सिरोसिस

TOI च्या रिपोर्टनुसार , कुलीच्या शूटिंगदरम्यान जेव्हा अमिताभ बच्चन जखमी झाले तेव्हा त्यांनी अनेकांनी रक्तदान केले. पण इथेच माशी शिंकली रक्तदात्यांपैकी एकाला हिपॅटायटीस बीचा त्रास होता आणि त्याचे रक्तही अमिताभ यांच्या शरीरात गेले. त्यामुळे त्यांचे 75 टक्के यकृत खराब झाले होते.

हेही वाचा :  ऋजुता दिवेकरने सांगितल्या प्रवासातील ४ बेस्ट टिप्स, यामुळे तुमचा प्रवास होईल अधिक सुखकर

(वाचा :- Reduce Period Pain: मासिक पाळीत होणाऱ्या असह्य वेदनांपासून ही 20 रुपयांची गोष्ट देईल आराम) ​

मायस्थेनिया ग्रॅव्हिस (Myasthenia Gravis)

-myasthenia-gravis

अमिताभ बच्चन यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस हा आजार आहे. हा स्नायूंशी संबंधित असा आजार आहे ज्यामध्ये स्नायू कमकुवत होतात, त्यामुळे रुग्णाला शारीरिक काम करण्यात त्रास होतो आणि तो लवकर थकतो. खरं तर, या आजारात मज्जासंस्थेच्या पेशी आणि शरीराच्या स्नायूंमधील संपर्क संपतो. 1984 मध्ये अमिताभ यांना या आजाराची माहिती मिळाली.

(वाचा :- Reduce Period Pain: मासिक पाळीत होणाऱ्या असह्य वेदनांपासून ही 20 रुपयांची गोष्ट देईल आराम) ​

मणक्यातील टीबी

मणक्यातील टीबी

2000 साली अमिताभ यांच्यावर मणक्याच्या टीबीवर उपचार करण्यात आला. असे म्हटले जाते की त्या काळात ते कौन बनेगा करोडपतीचे शूटिंग करत होते. शूटिंगदरम्यान त्यांना 8-10 गोळ्या खाव्या लागल्या असायच्या.

डायव्हर्टिकुलिटिस (पाचन रोग)

डायव्हर्टिकुलिटिस (पाचन रोग)

हा पचनसंस्थेशी संबंधित आजार आहे. या स्थितीत, आतड्यांवर डायव्हर्टिक्युला नावाचे लहान पाउच संक्रमित होतात आणि सुजतात. अमिताभ यांच्यावर 2005 मध्ये त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली.

(वाचा :- Ways to Reduce Uric Acid: ना औषध, ना पथ्यपाणी फक्त या 8 गोष्टी करा, युरीक अ‍ॅसिड रक्तातूनच खेचून वेगळे होईल)

हेही वाचा :  अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कोरोनाची लागण

कोरोनाची लागण

2020 च्या कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात, त्यांना कोविड -19 चा फटका बसला, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यालाही कोरोनाची लागण झाली होती.
(टिप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …