PMC : पुणे महानगरपालिकेत विनापरीक्षा होणार थेट भरती, पगार 70,000 पर्यंत | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक ०९, १०, ११, १४, १५ १६, १७, २२, २३, २४, २५, २८, २९ व ३० नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १५

रिक्त पदाचे आणि शैक्षणिक पात्रता :

१) माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक / Information Technology System Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (आयटी) किंवा एमसीए मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा रुग्णालय / वैद्यकीय किमान महाविद्यालयामध्ये वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. HMIS सबंधित कामाचा अनुभव असणाऱ्याना प्राधान्य देण्यात येईल.

२) वसतिगृह गृहपाल महिला / Hostel Warden – Female ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण. ०२) तत्सम ०५ वसतिगृह पदाचा व्यवस्थापनाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

३) वसतिगृह गृहपाल पुरुष / Hostel Warden – Male ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा वसतिगृह व्यवस्थापनाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

४) खरेदी व स्टोअर व्यवस्थापक / Purchase cum Store Officer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा किमान ५ वर्षांचा वैदयकीय महाविद्यालय किवा ३०० खाटा क्षमता असलेल्या रुग्णालयातील अनुभव असणे आवश्यक.

हेही वाचा :  दुर्गम डोंगरी भागातील तरुणाची MPSC परीक्षेत बाजी, पहिल्याच प्रयत्नात झाला PSI..

५) मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापक / HR Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए -(HR) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा रुग्णालय/ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तत्सम पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

६) कायदेशीर सहाय्यक / Legal Assistant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) एलएलबी मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

७) मुख्य लेखापाल / Chief Accountant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा किमान ५ वर्षांचा वैद्यकीय महाविद्यालयाचा अनुभव असणे आवश्यक. ०३) Tally Accounting मधील अनुभव आवश्यक.

८) रुग्णालय व्यवस्थापक/प्रशासक / Hospital Manager / Admin Strator ०१
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस + एमडी (हॉस्पिटल प्रशासन) किंवा MCI द्वारे मान्यताप्राप्त संस्थांकडून एमबीबीएस + MHA (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया)

९) विद्यार्थी समुपदेशक / Student Counselor ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीयुत्तर शिक्षण (मानसशास्त्र / समुपदेशन) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण.०२) तत्सम पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक, विविध भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. ०३) वैदयकीय पदवीधारक व वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

हेही वाचा :  12वीत असताना लग्न झाले ; वडील मजूर कामगार पण लेक मेहनतीच्या जोरावर बनली सहाय्यक कर आयुक्त!

१०) जैव- वैद्यकीय अभियंता / Bio-Medical Engineer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई.- (Bio-Medical) मान्यताप्राप्त संस्था/ विदयापीठाची पदवी उत्तीर्ण. ०२) रुग्णालय/ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तत्सम पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

११) ईसीजी तंत्रज्ञ / ECG Technician ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.पी.एम.टी.(कारडीओलॉजी)/ बी.एस्सी. पॅरोमेडिकल टेक्नॉलॉजी/ बी.एस्सी.फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी मध्ये व ई सी जी तंत्रज्ञ परिक्षा उत्तीर्ण.

१२) श्रवणयंत्र तंत्रज्ञ / Audiometric Technician ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी.स्पीच आणि श्रवण/ ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी पदवी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा रुग्णालयामध्ये किमान ०२ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. (ENT-किमान २ वर्ष)

१३) अपवर्तनवादी / Refractionist Optometrist ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी . नेत्रचिकित्सा (Ophthalmology) तंत्रात पदवी मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा किमान ३ वर्षाचा – अनुभव.

१४) लघुटंकलेखक / Steno ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ०२) इंग्रजी/ मराठी लघुलेखणाची गती १०० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक.

हेही वाचा :  MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 673 पदांसाठी नवीन भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

१५) नळ कारागीर / Plumber ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक ०२) टेक्निकल एज्युकेशन विभागाचे बॉम्बेचे नळ कारागीर प्रमाणपत्र असणाऱ्याना प्राधान्य. तत्सम पदाचा रुग्णालय/ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अनुभव असणाऱ्याना प्राधान्य.

याची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]परीक्षा फी :
पगार (Pay Scale) : २१,०७०/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण :
पुणे (महाराष्ट्र)

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण :
भारतरत्न अटलबियारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.
अधिकृत संकेतस्थळ :
 www.pmc.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अल्पभूधारक शेतकऱ्याची लेकाने पटकावला UPSC परीक्षेत ३९५वा रॅंक….

UPSC Success Story आर्थिक परिस्थिती बेताची….साडेचार एकर जमीन… सोयाबीन, कापूस, तूर हंगामी पिके… संपूर्ण कुटुंब …

RITES मध्ये निघाली भरती, परीक्षेशिवाय होणार निवड, 85000 महिना पगार मिळेल

RITES Limited मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. RITES मध्ये काही रिक्त …