सिरीजचा पुढचा भाग म्हणजे ‘हाऊसफुल 5’ साठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. साजिद नाडियावालाने ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या सीरिजची निर्मिती केली आहे. आता ते ‘हाऊसफुल 5’ चित्रपटासाठी तयारी करत असल्याची माहिती ‘पिंकविला’ने दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘हाऊसफुल’ सीरिजमधील सगळे कलाकार ‘हाऊसफुल 5’ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. ‘हाऊसफुल 4’ चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच साजिद नाडियावाला या सीरिजच्या पुढच्या भागाचा विचार करत आहेत. ‘हाऊसफुल’ सीरिजमधील सगळ्या पात्रांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न ‘हाऊसफुल ५’ मध्ये करण्यात येत आहे. कथा आणि पटकथा यावर अजूनही काम सुरू आहे. ‘हाऊसफुल 5’ हा या सीरिजमधील सगळ्यात मोठा चित्रपट असणार आहे.
हेही वाचा – Shahrukh khan: सिनेमा फ्लॉप होताच शाहरूख सोडणार इंडस्ट्री? करणार ‘हे’ काम; अभिनेत्याचं ‘ते’ ट्विट चर्चेत
‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या सीरिजचे निर्माते साजिद नाडियावाला स्वत: ‘हाऊसफुल ५’साठी लिहिण्यात येत असलेल्या स्क्रिप्टमध्ये लक्ष घालत आहेत. या चित्रपटात आतापर्यंत हाऊसफूलच्या सिरीजमध्ये असलेले सगळे कलाकार एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसह, रितेश देशमुख, बॉबी देओल, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच ‘हाऊसफुल’ सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या अभिनेत्रींही झळकणार असल्याची माहिती आहे.
चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याविषयी अजून अधिकृत माहिती नसली तरी हा चित्रपट पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे नक्की. 2010 साली ‘हाऊसफुल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2012 आणि 2016 साली या चित्रपटाच्या सीरिजमधील दुसरा आणि तिसरा भाग प्रदर्शित करण्यात आला होता. ‘2019’ मध्ये ‘हाऊसफुल 4’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा पुढच्या भागाचा विचार निर्माते करत होते. आता लवकरच ‘हाऊसफुल 5’ ची मजा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या