‘गॉडफादर’ची अक्षय जादू


रामगोपाल वर्मा

‘द गॉडफादर’ हे पुस्तक मी त्यावरील चित्रपट पाहण्याच्या आधी वाचलं होतं. मी सीनियर इंटरच्या वर्षांला असताना माझ्या एका मित्रानं मला मारियो पुझोचं हे पुस्तक वाचायला दिलं. पुस्तक देताना त्यानं मला सांगितलं : ‘पुस्तकाच्या २६ व्या पानावर एक सेक्स सीन आहे.’ ‘गॉडफादर’ माझ्या आयुष्यात आला तो असा! ते पान वाचल्यानंतर मी पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा मजकूर वाचला, त्यावर ते पुस्तक माफियांबाबत असल्याचं लिहिलं होतं. ‘माफिया’ हा शब्द मी त्यापूर्वी कधीही ऐकला नव्हता. जेव्हा मी हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं तेव्हा त्याचं कथानक, त्यातल्या व्यक्तिरेखा आणि त्यातल्या नाटय़ाने मला खूपच प्रभावित केलं होतं. इतकं, की मी लागोपाठ तीन ते चार वेळा तरी हे पुस्तक नक्कीच वाचलं असेन. एकदा वाचून झालं की लगेचच पुन्हा मी ते वाचायला घ्यायचो आणि दर वेळी मला त्यातले अनेक नवनवे बारकावे सापडत गेले. या कलाकृतीचा माझ्यावर झालेला परिणाम इतका मोठा होता की, मी तर म्हणेन चित्रपटाद्वारे कथा सांगण्यात मला जो रस निर्माण झाला, तो ‘द गॉडफादर’ हे पुस्तक आणि त्यावरील चित्रपटामुळेच! मी जेव्हा दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी अनेकदा ‘गॉडफादर’मधील दृश्यं, त्यातील संवाद किंवा एखाद् दुसरा क्षण हा संदर्भ म्हणून वापरला आहे.. अजूनही वापरतो.

हेही वाचा :  चंद्रकांत पाटील यांच्याकडून आणखी एक तारीख, म्हणाले 'या तारखेनंतर मविआची सत्ता जाणार'

मी जेव्हा पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांना भेटलो तेव्हा मला ‘गॉडफादर’चे भारतीय रूप (‘सरकार’ हा चित्रपट) काढण्याचा विचार माझ्या मनात आला. ‘द गॉडफादर’ ही काही एका माफिया डॉनची कथा नाही. कारण माफियांसारखेच सामर्थ्यवान लोक हे गुंड, राजकीय नेते, हुकूमशहा किंवा राजा अशा अनेकविध रूपांमध्ये सर्वत्र अस्तित्वात असलेले आपल्याला दिसतात. अशा व्यक्ती आपले सामर्थ्यवान व्यक्तिमत्त्व आणि करिष्म्याच्या जोरावर लोकांना प्रभावित करीत असतात. भारतीय संदर्भात मला वाटतं, बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व या व्यक्तिरेखेच्या जवळ जाणारे होते. ही अशी एक व्यक्ती होती, की जी कुठल्याही अधिकाराच्या पदावर किंवा राजकीय सत्तास्थानी विराजमान नव्हती, तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जनमानसावर प्रचंड प्रभाव होता. इतका, की त्यांच्यासाठी ‘मरने या मारने के लिये’ही माणसं तयार असत.

मला खरंच असं वाटतं की, ‘गॉडफादर’ हा असा एक दुर्मीळ चित्रपट होता, की ज्यात कुणीही कोणतीही गोष्ट एक-दुसरीपासून वेगळी करू शकणार नाही.

जणू नियतीनेच या साऱ्या गोष्टी घडवून आणल्या आहेत असं त्यात वाटतं. या चित्रपटाचा नायक जरी मार्लन ब्रॅण्डो हा असला तरी यातलं एकही पात्र असं नव्हतं की जे विस्मरणात जाऊ शकेल. छायाचित्रणकार गॉर्डन विलीस याने तत्पूर्वी शंभरावर चित्रपटांची प्रकाशयोजना आणि दृश्यसंरचना केली असली तरी ‘गॉडफादर’च्या जवळपास त्यातला एकही चित्रपट येऊ शकणार नाही. तीच गोष्ट संगीतकार निना रोटा ते लेखक मारियो पुझो आणि दिग्दर्शक कोपोला यांच्याबाबतीतदेखील म्हणता येईल.

हेही वाचा :  पुण्यात पैशांसाठी पत्नीला रस्त्यावर उभे करुन वेश्याव्यवसाय, 2 मित्रांनाही बनवले ग्राहक

माफियांचा ‘मानवी चेहरा’ हा अनेक चित्रपटांतून आजवर आपल्याला पाहायला मिळाला आहे. अशा फिल्म्सना लोकप्रियताही मिळते. मला वाटतं, ‘गॉडफादर’ ही अत्यंत क्रूर गुंड व माफियांना ‘मानवी चेहरा’ देणारी पहिलीच फिल्म असावी. तत्पूर्वी गुन्हेगार हे नेहमीच धोकादायक आणि भीतीदायक स्वरूपात दाखवले जात. परंतु ‘गॉडफादर’मध्ये ते तुमच्या-आमच्यासारखे किंवा एखाद्या सामान्य कुटुंबातल्यासारखे दाखवले आहेत; जेणेकरून आपण त्यांच्याशी आणि त्यातल्या कथानकाशी स्वत:ला ‘रिलेट’ करू शकतो.  

‘द गॉडफादर’ हा अशा खजिन्यासारखा आहे, की जोपर्यंत माणूस आणि मानवी भावभावना अस्तित्वात आहेत, तोपर्यंत त्यातून काही ना काही नवा आशय तो पाहणाऱ्याला गवसत राहील. या चित्रपटातल्या प्रत्येक पात्रावर एकेक स्वतंत्र चित्रपट तयार केला जाऊ  शकतो असं मला कायम वाटत आलं आहे.

‘गॉडफादर’ हा चित्रपट त्याच्या आशयसंपन्न अशा मूळ कादंबरीला योग्य न्याय देणारा चित्रपट आहे. अशी आशयसंपृक्त पुस्तकं क्वचितच वाचायला मिळतात. आज अशी पुस्तकं लिहिली जाणं जवळपास अशक्यच आहे. भारतात तर नाहीच नाही. कारण कथात्म साहित्याचा विचार करता आपण पाश्चिमात्य लेखकांच्या प्रतिभेच्या जवळपासही जाऊ  शकत नाही. आणि पाश्चिमात्य देशांतही आताच्या नेटफ्लिक्सच्या काळात वाचनाला पूर्वीसारखं महत्त्व मिळणं शक्य दिसत नाही.

हेही वाचा :  ... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच

कादंबरीचं वा कथात्म साहित्याचं चित्रपटात माध्यमांतर करताना चित्रपटकारासमोर अनेक आव्हानं असतात. अगदी ‘गॉडफादर’च्या बाबतीतही चित्रपटकर्ते माध्यमांतरात अंशत:च यशस्वी झाले आहेत असं मला वाटतं. परंतु आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की, दोन-अडीच तासाच्या चित्रपटात मूळ कादंबरीतील संपूर्ण आशय जशाच्या तसा आणणं ही तशी अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीही कोपोलाने ‘गॉडफादर’मध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल.

[email protected]

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …