cooking hacks: मऊसूद चपाती बनवायची आहे तर कणिक मळताना मिसळा ही गोष्ट…लुसलुशीत चपाती बनलीच म्हणून समजा!

Kitchen Cooking Tips​ : गव्हाची पोळी खाणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. पण त्यातही पोळी करणे हे नवशिक्यांसाठी एक चॅलेंज सारखंच असतं.  (roti making tips) अनेकांच्या पोळ्या काही तासानंतर कडक होतात. यावेळी अनेक गोष्टींना दोष दिला जातो, पण पोळीतला (Wheat Roti) कडकपणा काही करता कमी करता येत नाही. पण काही साध्या पण चमत्कारीक गोष्टी देखील असतात, त्या पाळल्या तर तुमच्या हातची पोळी देखील मऊ लुसलुशीत होवू शकते आणि तासंनतास मऊच राहते. (how to get soft roti)

बऱ्याचदा चपाती भली नाही म्हणून कडक झाली किंवा जास्त भाजली गेली म्हणून कडक राहिली अश्या अनेक गोष्टींना दोष दिला जातो पण त्या आधीची एक प्रोसेस असते त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो..

चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)

पीठ मळताना घ्या ही काळजी 

1- पीठ मळताना जर ते हाताला खूप चिकटू लागले तर समजून घ्या, त्यात खूप पाणी आहे. २-३ चमचे कोरडे पीठ घेऊन ताटात ठेवा म्हणजे ते पीठ जास्तीचे पाणी शोषून घेईल. (chapati hacks)

हेही वाचा :  'सुरक्षा न घेता, बुलेटप्रुफ जॅकेट न घालता येईन...' काश्मिर यात्रेवरुन पीएम मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

2- पीठ खूप कठीण  झालं असेल  तर त्यात थोडे पाणी घालून पीठ बोटांनी दाबून घ्या. त्यामुळे पिठात पाणी चांगले मुरून जाईल.

3- एकदा का पीठ मळलं कि मग ते परातीत ठेवा त्यावर हलकासा ओला रुमाल झाकण म्हणून ठेऊन द्या यामुळे पीठ मऊ राहते आणि चपाती चांगली मऊ आणि लुसलुशीत येते.  (how to make soft and raound chapati tips)

4- जर तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी पीठ मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अश्याने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं. 

5- पीठ मळून लगेच चपाती बनवण्याऐवजी किमान 10 मिनिटांनी चपाती बनवायला घ्यावी.पीठ मळल्यानंतर थोडावेळ ठेवल्यास त्या पिठाच्या चपात्या खूप छान फुलतील..   (cooking tips)

6- एक गोष्ट नीट लक्षात ठेवा २४ तासांपेक्षा जास्त वेळ पीठ मळलेलं असेल तर ते वापरू नका. चपात्या चांगल्या येणार तर नाहीच शिवाय याचा आरोग्यावर परिणामसुद्धा होईल. (Health issues)

7-ज्या भांड्यात पीठ ठेवत आहात त्या भांड्यात तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्या आणि मग त्यात मळलेल्या पिठाचा गोळा ठेवा. असं केल्याने पीठ सुकत नाही.

हेही वाचा :  घरीच गांजा पिकवायचे अन् कॉलेजमध्ये विकायचे! MBBS विद्यार्थ्यांचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावले

8- हलके तेल किंवा तूप लावल्याने पीठ सुकत नाही आणि बराच काळ ताजे राहते शिवाय चपात्या छान येतात. . (kitchen cooking hacks how to get fluffy soft chapati dough fulka phooli hui chjapati tips in marathi )



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …