तब्बल 1 वर्षं आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या मुली, दुर्गंध पसरु नये म्हणून वापरायच्या अगरबत्ती, सांगाड्याला घेऊन….

वाराणसीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. येथे दोन मुली तब्बल एक वर्षांपासून आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या. आईच्या मृतदेहाचा पूर्ण सांगाडा झाल्यानंतरही मुलींनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. या काळात त्या घरात वाढदिवस आणि इतर पार्ट्या करत होत्या. 

मुली मागील अनेक दिवसांपासून घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना कळवलं. यानंतर नातेवाईक घऱी पोहोचले होते. तिथे त्यांनी जे चित्र पाहिलं त्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगाडा झालेला मृतदेह घराबाहेर काढत ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस सध्या दोन्ही मुलींची चौकशी करत आहेत. मृतदेह घरात का ठेवला होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. 

लंका पोलीस ठाणे क्षेत्राच्या मदरवा येथे ही घटना घडली आहे. येथील एका निर्जनस्थळी असणाऱ्या घरातून पोलिसांनी 52 वर्षीय उषा त्रिपाठी नावाच्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह गेल्या एक वर्षांपासून घरात पडला होता. महिलेच्या दोन्ही मुली या मृतदेहासोबतच राहत होत्या. 27 वर्षांची मोठी मुलगी पल्लवी त्रिपाठी पोस्ट पदव्युत्तर असून, छोटी 17 वर्षीय मुलगी वैश्विक त्रिपाठी दहावी उत्तीर्ण आहे. 

हेही वाचा :  Ayodhya Ram Mandir : 'मंदिर वही बनायेंगे और कायदे से ही बनायेंगे'; 33 वर्षांपूर्वी असं भाकित करणारे देवराह बाबा आहेत तरी कोण?

घरात ठेवलेल्या उषा त्रिपाठी यांच्या मृतदेहाचा पूर्ण सांगाडा झाला होता. मृतदेह चादरीत गुंडाळून एका खोलीत ठेवण्यात आला होता. मुलींनी सांगितल्यानुसार, 8 डिसेंबर 2022 रोजी तब्बेत बिघडल्याने आईचा मृत्यू झाला. वडील काही वर्षांपूर्वी घर सोडून गेले आहेत. 

असा उघड झाला गुन्हा

मुली मागील अनेक दिवसांपासून घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी उषा त्रिपाठी यांच्या मिर्झापूरमधील नातेवाईक धर्मेंद्र चतुर्वैदी यांना कळवलं. यानंतर धर्मेंद्र, पत्नीसह घऱी पोहोचली. घऱाचा दरवाजा उघडला असता दोन्ही मुली उषा त्रिपाठी यांच्या मृतदेहासह बसल्या होत्या. हे पाहिल्यानंतर धर्मेंद्र चतुर्वैदी यांना धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. 
पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मुलींनी गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या दोन्ही मुलींची चौकशी केली जात आहे. 

दोन्ही मुलींनी आईचा मृतदेह एका खोलीत लपवला होता. दुर्गंध पसरु नये यासाठी त्यांनी अगरबत्तीचा वापर केला. दरम्यान शेजारी घर नसल्याने लोकांनाही समजलं नाही. 

मागील एक वर्षांत जेव्हा नातेवाईक घऱी येत असत तेव्हा मुली आईची तब्येत बरी नाही सांगत त्यांना परत पाठवत असत. त्या कोणालाही आईला भेटू देत नव्हत्या. दरम्यान मुली शेजाऱ्यांकडून पैसे उधार घेत तसंच दागिने विकून घऱ चालवत होत्या असं समजलं आहे. दोन्ही मुलींची मानसिक स्थिती चांगली नसल्याचं पोलीस म्हणाले आहेत. 

हेही वाचा :  Last Rites: अंत्यसंस्काराच्या वेळी 'राम नाम सत्य है' का बोलतात, कारण जाणून आश्चर्य वाटेल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …