शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी 2023, अंतिम सामन्यात महेंद्रला चितपट करत आस्मान दाखवलं

Maharashtra Kesari Pune News : पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळाला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे.

दोघेही एकाच तालमीचे मल्ल

विशेष म्हणजे दोन्ही मल्ल हे पुण्याच्या तालमीतच तयार झाले आहेत. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्या शिष्याने यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.

महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी माती आणि गादी विभागातील फायनलच्या स्पर्धेत शिवराज आणि महेंद्र यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. यावेळी आधी माती विभागातील अंतिम लढत झाली. ही अंतिम लढत अतिशय चुरशीची झाली. सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांनी एकमेंकाना तोडीस तोड खेळ दाखवला. अखेरपर्यंत दोघेही एकमेंकावर भारी पडत होते. पण अखेर 6-4 अशा फरकाने महेंद्रने सिंकदरला मात देत फायनलमध्ये धडक दिली. दुसरीकडे मॅट विभागातील अंतिम लढत पुण्याच्या राजगुरुनगरमधील शिवराज राक्षे (Nanded Shivraj Rakshe) आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Nashik Harshvardhan Sadgir) यांच्यात पार पडली. ही लढत फारच एकतर्फी झाल्याचं दिसून आलं शिवराजनं सुरुवातीपासून आपलं वर्चस्व सामन्यावर बनवलं आणि अखेर 8-1 अशा मोठ्या फरकाने सामना जिंकत फायनल गाठली.

हेही वाचा :  ऋतुराज गायकवाडचं आणखी एक शतक; महाराष्ट्राचं सौराष्ट्रासमोर 249 धावांचं आव्हान

news reels

पुण्यात दिमाखात पार पडली महाराष्ट्र केसरी स्पर्धा

पुण्यात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजन गटात विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरुवातीपासूनच चर्चेत होती. संस्कृती प्रतिष्ठानचेवतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा 45 संघ आणि 900 हून अधिक पैलवान या स्पर्धेत उतरले होते. कुस्ती शौकिनांनी देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात 1961 साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक मल्लांनी या महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे. हे मल्ल नेमके कोण ते पाहूया…

आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी

1) पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)
 2) पैलवान भगवान मोरे (धुळे, 1962),
 3) पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती, 1964), 
4) पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक, 1965), 
5) पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई, 1966), 
6) पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव, 1976), 
7) पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर, 1968), 
8) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969), 
9) पैलवान दादू चौगुले (पुणे, 1070), 
10) पैलवान दादू चौगुले (अलिबाग, 1071), 
11) पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972), 
12) पैलवान लक्ष्मण वडार (अकोला, 1973), 
13) पैलवान युवराज पाटील (ठाणे, 1974), 
14) पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975), 
15) पैलवान हिरामण बनकर (अकलूज, 1976),
16) पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978), 
17) पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979), 
18) पैलवान इस्माईल शेख (खोपोली, 1980), 
19) पैलवान बापू लोखंडे (नागपूर, 1981), 
20) पैलवान संभाजी पाटील (बीड, 1982), 
21) पैलवान सरदार खुशहाल (पुणे, 1983),
22) पैलवान नामदेव मोळे (सांगली, 1984), 
23) पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985), 
24) पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर, 1986), 
25) पैलवान तानाजी बनकर (नागपूर, 1987), 
26) पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर, 1988), 
27) पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992), 
28) पैलवान उदयराज जाधव (पुणे, 1993),
 29) पैलवान संजय पाटील (अकोला, 1994-95), 
30) पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96), 
31) पैलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97), 
32) पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98), 
33) पैलवान धनाजी फडतरे (पुणे, 1998-99), 
34) पैलवान विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000), 
35) पैलवान राहुल काळभोर (नांदेड, 2001), 
36) पैलवान मुन्नालाल शेख (जालना, 2001-02), 
37) पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03), 
38) पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04), 
39) पैलवान सईद चाउस (इंदापूर, 2004-05),
 40) पैलवान अमोल बुचडे (बारामती, 2005-06), 
41) पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007), 
42) पैलवान चंद्रहार पाटील (सांगली, 2008), 
43) पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009), 
44) पैलवान समाधान घोडके (रोहा, 2010), 
45) पैलवान नरसिंग यादव (अकलूज – 2011), 
46) पैलवान नरसिंग यादव (गोंदिया – 2012), 
47) पैलवान नरसिंग यादव (भोसरी – 2013), 
48) पैलवान विजय चौधरी (अहमदनगर-2014), 
49) पैलवान विजय चौधरी (नागपूर-2015), 
50) पैलवान विजय चौधरी (वारजे-2016), 
51) पैलवान अभिजीत कटके (भूगाव-2017),
 52) पैलवान बाला रफीक शेख (जालना-2017), 
53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019), 
54) पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-2021-22)

हेही वाचा :  1992च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती, यंदाही पाकिस्तानचा संघ रोजे ठेवून फायनल खेळणार!

55)पैलवान शिवराज राक्षे (पुणे 2023)

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …