Video : गाढविणीच्या दुधाच्या साबणाने महिला सुंदर दिसतात… भाजप खासदाराचे वक्तव्य

Maneka Gandhi : महिलांच्या सौंदर्यप्रसाधनांवरुन (beauty products) कायमच चर्चा सुरु असते. काही महिन्यांपूर्वी सौंदर्यप्रसाधनांमुळे महिलांच्या जीवाला असलेल्या धोक्याबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये असलेल्या काही घातक घटकांमुळे महिलांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावं लागल्याचेही समोर आले आहे. अशातच आता माजी केंद्रीय मंत्री भाजपच्या (BJP) खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी एक अजब दावा केला आहे. गाढविणीच्या दुधापासून (Donkey Milk Soap) बनवलेल्या साबणाने स्त्रिया सुंदर राहतात, असे मनेका गांधी यांनी म्हटले आहे. मनेका गांधी या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि सुलतानपूरच्या भाजपच्या खासदार मनेका गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सुलतानपूरच्या बलदिराईत बोलताना खासदार मनेका गांधी यांनी हे विधान केले आहे. “गाढविणीच्या दुधापासून बनवलेला साबण स्त्रीचे शरीर नेहमीच सुंदर ठेवतो. परदेशात एक अतिशय प्रसिद्ध ‘क्लियोपात्रा’ नावाची राणी राहायची. ती गाढविणीच्या दुधाने आंघोळ करायची. गाढविणीच्या दुधाचा साबण दिल्लीत 500 रुपयांना विकला जातो. आपण शेळीच्या दुधाचा साबण का बनवत नाही,” असे मनेका गांधी म्हणाल्या.

हेही वाचा :  “किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, हे गुंडाराज…”, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

“किती दिवसांपासून आपण गाढवे पाहिली नाहीत. ती कमी झाली आहेत किंवा गायब झाली आहेत. धोब्याचे कामही संपले आहे. पण लडाखमध्ये तिथल्या लोकांनी गाढविणीचे दूध काढण्यास सुरुवात केली आणि त्या दुधापासून साबण बनवला.  गाढविणीच्या दुधाचा साबण स्त्रीचे शरीर नेहमीच सुंदर ठेवतो, असेही मनेका गांधी म्हणाल्या.

“सध्या झाडे लुप्त होत आहेत. लाकूड तर इतके महाग झाले आहे की माणूस मेला तर त्याचे संपूर्ण कुटुंब गरीब होऊन जाईल. अंत्यसंस्कारामध्ये लाकडासाठी 15-20 हजार लागतात. त्यामुळे शेणाचे वापर करणे चांगले आहे. ज्याचा मृत्यू होईल त्याचे अंत्यसंस्कार शेण टाकून करण्यात यावेत असा आदेश द्यायला हवेत. त्यामुळे 1500 ते 2000 पर्यंत विधी उरकले जातील,” असा सल्लाही मनेका गांधी यांनी दिला.

हेही वाचा :  भाजपाला मोठा धक्का! पुढील काही आठवड्यात हे राज्य 'हात'चं जाणार

दरम्यान, मनेका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असे खरेच घडते का, असा सवाल लोक करत आहेत. जर गाढव इतकं फायदेशीर असेल तर ते प्रत्येक घरात ठेवलं पाहिजे. आरोग्याबरोबरच सौंदर्य टिकेल, असेही एका युजरने म्हटलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Godrej Family Tree : लहानपणी तुमच्याही घरात असेल या कंपनीचे कपाट, आता 14 लाख कोटींची कंपनी

देशातील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक असलेले गोदरेज कुटुंब आज तब्बल 127 वर्षांनंतर विभक्त होणार आहे. …

‘असा कसा डॉक्टर बनणार रे तू?’; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. …