आता अनोळखी नंबर होणार Mute, WhatsApp घेऊन येतंय एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स

नवी दिल्ली : WhatsApp Upcoming Features : सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. दरम्यान जगात कोट्यवधी लोक हे वापरत असल्याने व्हॉट्सॲप देखील आपल्या युजर्सच्या वाढत्या गरजा पाहत त्याप्रकारे वेगवेगळे बदल आपल्या ॲपमध्ये करत असते. मागील काही काळापासून व्हॉट्सॲप नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. आता देखील कंपनी काही नवीन भारी फीचर्स घेऊन येत आहे, ज्याच्या मदतीनं अनोळखी नंबर म्युट करता येणार असून तसंच अॅन्ड्रॉई़डमध्येही अॅपलप्रमाणे व्हॉट्सॲप वापरल्याचा फील येणार आहे. चला तर जाणून घेऊन काही नव्याने येणाऱ्या फीचर्सबद्दलअनोळखी कॉल होणार Mute
काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲपमध्ये एक नवं फीचर येणार होतं, ज्यामुळे अनोळखी नंबरवरुन आलेला फोन व्हॉट्सॲपवर आपोआप सायलेंट होणार होता. आता लवकरच हे फीचर कंपनी घेऊन येणार आहे. व्हॉट्सॲपच्या नव्या फीचर्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetainfo च्या रिपोर्टनुसार अॅन्ड्रॉईड 2.23.10.7 अपडेटसोबत या फीचरला कंपनी आणणार आहे. याच्या मदतीने अनोळखी नंबरवरुन येणारा फोन सायलेंट करु शकतो. अनोळखी नंबरला सायलेंट करण्यासाठीची सेटिंग व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये प्रायव्हसी ऑप्शनमध्ये असेल.ती सेटिंग ऑन करताच हे फीचर वापरता येईल. फोन सायलेंट झाल्यावर नंतर कळण्यासाठी हा नंबर नोटिफिकेशन आणि कॉल लॉगमध्ये नक्कीच दिसेल.

हेही वाचा :  WhatsApp Tricks : व्हॉट्सॲपची जादुई ट्रिक! समोरच्यानं डिलीट केलेला मेसेजही वाचता येणार

वाचा : स्नेक गेमची मजा पुन्हा घेता येणार, २२ दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफही, पाहा नोकियानं आणलेले तीन जबरदस्त फोन्स

ॲन्ड्रॉई़डमध्येही ॲपलप्रमाणे व्हॉट्सॲप दिसणार
तसंच व्हॉट्सॲपमध्ये आणखी एक नवं फीचरही लवकरत येणार आहे. ज्यामुळे ॲन्ड्रॉईड फोन्समध्येही व्हॉट्सॲप अगदी ॲपलच्या आयफोनप्रमाणे दिसणार आहे. व्हॉट्सॲपमध्ये बीटा फॉर ॲन्ड्रॉईड 2.23.10.6 अपडेट एक नवा युजर इंटरफेस घेऊन येणार आहे. ज्यामुळे ॲन्ड्रॉईडफोनमध्ये देखील आता ॲपल फोनप्रमाणे नेविगेशन बार खालच्या बाजूस दिसणार आहे. ज्यामुळे ॲन्ड्रॉईड फोनमध्ये आयफोन वापरल्याचा फील येईल.

वाचा : समोरच्याला न सांगता त्याची लोकेशन आता ट्रॅक करता येणार, Google Map ची ‘ही’ आहे खास ट्रिक

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …