WhatsApp घेऊन येत आहे तीन नवे फीचर्स, आता चॅटिंग होणार आणखी सेफ

नवी दिल्ली : Upcoming WhatsApp Privacy features : सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. अगदी मित्र-मैत्रींणीसोबत नॉर्मल गप्पा-टप्पा असो किंवा ऑफिस कामासंबधी महत्त्वाची चॅटिंग सारंकाही आजकाल व्हॉट्सॲपवरच होत असतं. त्यात व्हॉट्सॲप देखील आपल्या यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन फीचर्स घेऊन येत असतो.मागील काही दिवसांत व्हॉट्सॲपने नवनवीन अपडेट्ससह नवे फीचर्स आणले असून आता देखील कंपनी आणखी तीन नवीन फीचर्स आणत आहे. व्हॉट्सॲपच्या नवनवीन फीचर्सची आधी माहिती देणाऱ्या WABetainfo ने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान व्हॉट्सॲप कधी एकत्र हे फीचर्स रिलीज करत नसून आधी बीटा व्हर्जनमध्ये टेस्टिंग करते, त्यानंतर ब्गस ठीक करुन त्यांना सर्वांसाठी रिलीज करत असते. तर आता नव्याने येणारे फीचर्स नेमके कोणते ते जाणून घेऊ…

लॉक्ड चॅट
जर तुम्ही एखाद्याशी चॅट करत असताना त्या कॉन्टॅक्टसोबतची चॅट खाजगी ठेवू इच्छित आहात, म्हणजेच दुसऱ्या कॉन्टॅक्ट्सपासून लांब ठेवू इच्छित असाल तर हे लॉक्ड चॅट फीचर तुमच्यासाठी भारी आहे. आता तुम्ही हवं असेल तर संपूर्ण व्हॉट्सॲप या ॲपला लॉक करु शकता. पण तुम्हाला हवं ते स्पेसफिक चॅट लॉक करण्याचं फीचर लवकरच व्हॉट्सॲप घेऊन येत आहे.

हेही वाचा :  पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?

स्टेटस थेट फेसबुकला होणार शेअर
तुम्ही आता व्हॉट्सॲपवरील स्टोरी २४ तासांसाठी इन्स्टाग्रामवरही पोस्ट करु शकता. यामध्ये फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट किंवा ऑडिओ शेअर करु शकता. आता यामध्ये फेसबुक शेअरिंगही करता येणार आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपवरील स्टोरीज आता थेट फेसबुकलाही शेअर करता येणार आहे.

वॉईस ट्रान्स्क्रिप्शन
अनेकदा व्हॉट्सॲपवर आपण एकमेंकाना पाठवतो ते ऑडिओ मेसेज ऐकणं शक्य नसंत. कधी कधी आजूबाजूला फार गोंगाट असतो किंवा आपण प्रायव्हेट स्पेसमध्येही नसतो. त्यासाठी आता व्हॉट्सॲप वॉईस ट्रान्स्क्रिप्शन हे फीचर आणत आहे. ज्यामुळे आता ऑडिओ मेसेजला थेट टेक्समध्ये रुपांतरीत करता येऊन समोरच्याला काय म्हणायचं आहे ते वाचाताा येईल.

वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …