WhatsApp : तुमचं व्हॉट्सॲपवरचा ‘बेस्ट फ्रेंड’ कोण आहे? या सोप्या ट्रिकने जाणून घेऊ शकता

नवी दिल्ली :WhatsApp Tricks and Tips : लाखो युजर्स व्हॉट्सॲप हे मेसेजिंग ॲप वापरत असतात, आपल्या चॅटलिस्टमध्येही कितीतरी लोक असतात. यात आपले मित्र, मैत्रीणी, फॅमिली, शाळा-कॉलेजांतील सोबती, ऑफिस कोवर्कर्स असे सारे असतात. आपण अनेकांशी चॅटही करतो. पण या सगळ्यात आपलं बेस्ट चॅटिंग बडी, म्हणजे एकप्रकारे व्हॉट्सॲपवरील बेस्ट फ्रेंड कोण हे ओळखता येऊ शकतं. यासाठी WhatsApp ची एक मजेशीर ट्रिकबद्दल जाणून घेऊ…

तर आता सर्वात आधी तुम्ही विचार कराल की व्हॉट्सॲपला कसं माहित नेमकं तुमचं बेस्ट फ्रेंड कोण आहे? पण व्हॉट्सॲप हे ठरवतं ते म्हणजे तुम्ही कोणाशी आणि किती चॅटिंग केली आहे, याप्रमाणावर. तर आता याआधारे व्हॉट्सॲपने काढलेली तुमच्या बेस्ट फ्रेंड्सशी लिस्ट कशी पाहाल जाणून घेऊ…

व्हॉट्सॲपवरील बेस्ट फ्रेंड्सची लिस्ट कशी पाहाल?

  • सगळ्यात आधी व्हॉट्सॲप ओपन करा, त्यानंतर वरच्या साईटला कोपऱ्यास असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. ज्यानंतर त्यामध्ये सेटिंग्स या ऑप्शनमध्ये जा.
  • त्यानंतर सेटिंग्समध्ये तुम्हाला Data and Storage Usage हा ऑप्शन दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल.
  • आता यावर क्लिक करताच तुम्हाला वरुन खालीपर्यंत क्रमवार अशाप्रकारे कॉन्टॅक्ट्सची लिस्ट दिसेल, ज्याच्यांशी तुम्ही सर्वाधिक चॅटिंग केली आहे.
  • या लिस्टनुसार तुम्ही पाहू शकता, कोण आहे तुमचं व्हॉट्सॲपवरचा बेस्ट फ्रेंड
हेही वाचा :  ग्लेन मॅक्सवेलची अचानक प्रकृती खालावली, काल रात्री नेमकं काय झालं? ऑस्ट्रेलिया क्रिकेट करणार चौकशी!

व्हॉट्सॲप घेऊन येत आहे नवीन लॉक्ड फीचर
व्हॉट्सॲप मागील काही दिवसांपासून आपल्या युजर्ससाठी एकापेक्षा एक फीचर घेऊन येत आहे. आताही त्यांनी एक भारी असं लॉक्ड फीचर आणणार असल्याचं सांगितलं आहे. तर समजा जर तुम्ही एखाद्याशी चॅट करत असताना त्या कॉन्टॅक्टसोबतची चॅट खाजगी ठेवू इच्छित आहात, म्हणजेच दुसऱ्या कॉन्टॅक्ट्सपासून लांब ठेवू इच्छित असाल तर हे लॉक्ड चॅट फीचर तुमच्यासाठी भारी आहे. आता तुम्ही हवं असेल तर संपूर्ण व्हॉट्सॲप या ॲपला लॉक करु शकता. पण तुम्हाला हवं ते स्पेसफिक चॅट लॉक करण्याचं फीचर लवकरच व्हॉट्सॲप घेऊन येत आहे.

वाचा : घरी आणा आधुनिक फीचर्ससह दमदार असा QLED TV, Amazon च्या सेलमध्ये मिळतेय तगडी सूट

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …