शशी थरुर यांना अमित शाहांचा फोन, थरुर म्हणाले “मी तर आश्चर्यचकित झालो…”


केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी थेट फोन कॉल करुन शुभेच्छा दिल्यामुळे शशी थरुर यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

काँग्रेसचे नेते तथा खासदार शशी थरुर नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. एक राजकारणी तसेच मोठा व्यासंग असणारा लेखक म्हणूनदेखील त्यांच्याकडे पाहिले जाते. आज त्यांचा वाढदिवस असून यानिमित्ताने संपूर्ण भारतातून त्यांना शुभेच्छा संदेश येत आहेत. मात्र विरोधी विचारधारा असणारे भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी थेट फोन कॉल करुन शुभेच्छा दिल्यामुळे शशी थरुर यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तसेच शाहा यांनी स्वत: फोन करुन शुभेच्छा दिल्यामुळे ६६ वर्षाचा होण्यामागे काहीतरी विषेश असावं असं भाष्यदेखील थरुर म्हटलंय.

“गृहमंत्री अमित शाहा यांनी फोन कॉल केल्यामुळे मी आश्चर्यचकित झालो. त्यांनी फोन करुन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ६६ वर्षांचा होण्यामागे काहीतरी विशेष असावं. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे खूप भारावलो. खूप खूप आभार,” असं थरुर यांनी ट्वीट करुन म्हटलंय.

शशी थरुर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जातात. देशातील विविध प्रश्नावर त्यांनी मांडलेल्या मताला विशेष महत्त्व असते. काँग्रेस पक्षामध्येदेखील त्यांचे विशेष स्थान आहे. विरोधी पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे वेगवेगळ्या स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले तर काही विशेष वाटणारे नाही. मात्र विरोधी विचारधारा असणारे भाजपचे नेते अमित शाह यांनी फोन कॉल करुन शुभेच्छा दिल्यामुळे थरुर यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

हेही वाचा :  Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …