अखेर सौर ऊर्जा मिळाली! चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार; मून मिशनबाबत मोठी अपडेट

Japan Moon Mission :  जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर यशस्वी लँडिग करुनही मून मिशन फेल ठरतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.  आता जपानच्या मून मिशनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लँडरची बॅटरी चार्ज होत नसल्याने जपानची मून मिशन धोक्यात आली होती. मात्र, चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार आहे. मून मिशनवर काम करणाऱ्या टीमला मोठं यश मिळाले आहे. 

07 सप्टेंबर 2023 रोजी जपानेचे हे  मून लँडर स्लिम चंद्राकडे झेपावले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून H-IIA रॉकेटद्वारे या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. 19 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड झाले आहे.  तब्बल 5 महिन्यानंतर जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रावर यशस्वी लँंडिंग करुनही तांत्रिक अडथळ्यांमुळे जपानची मून मिशन धोक्यात आले. 

जपानच्या मून लँडर स्लिमचे अचूक लँडिंग केले. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी चंद्रावरील शिओली क्रेटर ही जागा निश्चित केली होती. निश्चित जागेवरच हे यान लँड झाले. निश्चित करण्यात आलेल्या 600×4000 किमी जागेतच हे यान लँड झाले.

हेही वाचा :  ट्रान्सपरंट साडीत जिनिलिया वहिनींचा 'वेड' लावणारा लुक

जपानच्या लँडरला सौर ऊर्जा मिळाली

जपानचे हे  मून लँडर स्लिम  हे यान चंद्राच्या शिओली क्रेटर जागेवर उतरले आहे. शिओली क्रेटर या जागे जागेला Mare Nectaris असेही म्हणातात. हा प्रदेश चंद्राचा समुद्र म्हणून ओळखला जातो. चंद्रावरील या जागेत खूप गडद अंधार असतो. येथे सूर्य प्रकाश पडत नसल्याने सोलर पॉवर पावर सप्लाय निर्माण करण्यास अकार्यक्षम ठरत होते.  पुरेसा सुर्यप्रकाश पडत नसल्याने सोलर पॅनल चार्ज होत नव्हते.  सोलर पॅनलला पुरेशा सूर्य प्रकाश मिळावा यासाठी त्याची दिशा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेरीस दहा दिवसानंतर सोलर पॅनलची दिशा बदलण्यात यश आले आहे. आता सोलर पॅनलवर पुरेशा प्रकाश पडत असल्याने बॅटरी चार्ज होऊन लँडर पूर्ण क्षमतेने सक्रिय होईल असा विश्वास मून मिशनवर काम करणाऱ्या टीमने व्यक्त केला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; ‘तो’ मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..

Pune Porsche Car Accident: पुण्यातील कल्याणी नगर येथे 19 मे रोजी झालेल्या भीषण अपघातानामध्ये अल्पवयीन …

Pune Porsche Accident: ससूनच्या ‘त्या’ 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

पुण्यातील कल्याणनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोर्शे कारने दोघांना चिरडल्याने तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू …