थेट चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प, पृथ्वीवर Power सप्लाय; पुढच्या 10 हजार वर्षांची सोय

Chinese Lunar Exploration Program : सध्या अनेक देश चांद्र मोहिम राबवत नव नविन संशोधन करत आहेत. चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे संशोधकांचे प्रयत्न आहेतय या अनुषंगाने विविध प्रयोग केले जात आहेत. अशातच एक अत्यंत महत्वपूर्ण मोहिम संशोधकांनी हाती घेतली आहे. येत्या काळात चंद्र हा पृथ्वीसाठी लाईफ सेव्हर ठरणार आहे. कारण, चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे. या प्रयोग यशस्वी झाल्यास थेट चंद्रावरुन पृथ्वीवर Power सप्लाय होणार आहे. शिवाय  पुढच्या 10 हजार वर्षांसाठी विजेची सोय होणार आहे. 

वीज निर्मीतीबाबत तज्ञाचा पुस्तकात दावा

टीम मार्शल नावाच्या या तज्ज्ञाने अवकाश आणि चंद्रावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. टीम यांच्या मते, चंद्राचा पृष्ठभाग मानवांसाठी वरदान ठरू शकतो. चंद्राच्या या पृष्ठभागा खाली असे धातू आहेत ज्यांचा वापर वीज निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. या धातूंच्या मदतीने चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प उभा केला जाऊ शकतो. द टाइम्स नावाच्या आपल्या नवीन पुस्तकात  टीमने याबाबत सविस्तर लेखण केले आहे. चंद्राचा पृष्ठभागावर आढळाणारे हे  धातू पृथ्वीवर फार कमी प्रमाणात आढळतात. मात्र, चंद्राच्या पृष्ठभागावर याचा विपुल प्रमाणात साठा आहे.  त्यांचे उत्खनन करून, पृथ्वीवरील विजेची कमतरता कमी करण्यासाठी याच्या मदतीने वीज निर्मीती करता येवू शकते.

हेही वाचा :  VIDEO: मंगळ ग्रहावर कधी 'वादळ' पाहिलयं? NASA च्या रोव्हरनं टिपला अभूतपूर्व क्षण!

अशा प्रकारे करणार चंद्रावर करणार वीज निर्मीती

चीनचे संशोधक सध्या चंद्रावर वीज निर्मीती करण्याच्या प्रयोगावर काम करत आहेत. चंद्र अन्वेषण कार्यक्रमाचे मुख्य शास्त्रज्ञ ओउयांग जियुआन यांनी प्रयोगाबाबत माहिती दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर असे धातू सापडले, जे वीज निर्मितीसाठी उपयुक्त ठरतील. यांच्या मदतीने वीज निर्मीती केली जाईल. यामुळे पृथ्वीवरील विजेचा प्रश्न मार्गी लागेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील 10 हजार वर्षांसाठी विजेचा प्रश्न सुटेल असा दावा चीनी संशोधकांनी केला आहे. 2025 मध्ये नासा आंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. या मानवी चंद्र मोहिमेमुळे वीज निर्मीतीच्या प्रयोगात मदत होईल.  दरम्यान, यापूर्वीच NASA ने चंद्रावर उत्खननाचे काम सुरु केले आहे. विविध प्रयोगांसाठी चंद्रावर उत्खनन करण्यात आले आहे.  

काय आहे चीनचे मून मिशन

चीनची स्पेस एजन्सी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (CNSA)  चीन आणि पाकिस्तानचे संयुक्त मून मिशन फत्ते करणार आहे. 2024 मध्ये  चीन हे चान्गई-6 चाँग मिशन राबवणार आहे. चंद्र आणि पृथ्वी यांच्यात संवाद प्रस्थापित चीन मून मिशन रावबत आहे. यासाठा चीन Queqiao-2 किंवा Magpie Bridge-2 उपग्रह चंद्रावर पाठवण्याची तयारी करत आहे.  चांगई-6 मोहिमेअंतगर्त चीन चंद्राच्या अत्यंत गडद भागात संशोधन करणार आहे. अद्याप येथे कोणतेही संशोधन झाले नसल्याचा दावा चीनने केला आहे. हा भाग  दक्षिण ध्रुवाजवळच आहे. 

हेही वाचा :  Earth Facts: पृथ्वी ताशी 1600 किमी वेगानं फिरते, आपल्याला याचा थांगपत्ताही कसा लागत नाही?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …