हिवाळ्यात बाईक रायडिंगला निघताय? फुकटातली ‘ही’ शक्कल वापरा, अजिबात थंडी वाजणार नाही

Bike Riding In Winter: शहरी धकाधकीमध्ये वाहतूक कोंडीतून वाट काढत 40-50 च्या वेगावर बाईक चालवणारी मंडळी संधी मिळेल तेव्हा आणि तशी शहराच्या बाहेर जाऊन बाईक चालवतात. मुळात बाईक चालवण्याचा आनंद हा मोकळ्या रस्त्यांवर, शांततेच आणि एखाद्या निसर्गाच्या कुशीत दडलेल्या ठिकाणी जरा जास्तच घेता येतो. किंबहुना पावसाळा आणि हिवाळा हे बाईकप्रेमींचे रायडिंगसाठी आवडते ऋतू. अर्थात इथं अपवादही असू शकतात. 

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), लडाख (Ladakh), दक्षिण भारतातील काही ठिकाणं आणि राजस्थानमधील काही प्रदेशामध्ये बाईक रायडिंगसाठी जाण्याचा अनेकांचाच कल असतो. पण, इथं पहिल्यांदाच जाणाऱ्या मंडळींना मात्र काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात हिवाळ्यात मोठ्या उत्साहात रायडिंगसाठी निघालं असता बोचरी थंडी रायडिंगमध्ये व्यत्यय आणते अशा वेळी नेमकं काय करावं? 

उपाय इतके कमाल की, एक रुपयाही मोजाला लागणार नाही… 

एखादं जुनं वर्तमानपत्रसुद्धा तुम्हाला बोचऱ्या थंडीपासून वाचवू शकतं. एक लक्षात घ्या, वर्तमानपत्रामध्ये वारा रोखण्याची क्षमता असते. त्यामुळं तो गार वारा सहजपणे रोखून धरतो. त्यामुळं तुम्ही जॅकेट मध्ये पेपर ठेवल्यास गार वारा तुमच्या शरीरापर्यंत पोहोचत नाही आणि थंडी कमी लागते. 

हेही वाचा :  Whatsapp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो

वर्तमानपत्र जॅकेटमध्ये कसं ठेवाल? 

थंड हवेच्या ठिकाणी रायडिंगसाठी निघत असाल तर, एखादं जुनं वर्तमानपत्र घ्या आणि ते जॅकेटच्या आतमध्ये ठेवा. हे जॅकेटमध्ये अशा रितीनं लावा की तुमच्या छातीवर एक प्रकारचं आवरण तयार होईल. जॅकेटमध्ये पेपर लावण्यापूर्वी तो पूर्णपणे कोरडा आहे हे लक्षात घ्या. वर्तमानपत्र ओलं असल्यास तुम्हाला बाईक रायडिंगच्या वेळी थंडी वाजण्याची शक्यता असते. 

तापमान 4, 5 अंशांपर्यंत पोहोचत असल्यास त्या भागामध्ये बाईक रायडिंयसाठी तुम्ही निघत असाल तर, ग्रीप असणारे हातमोजे, पायमोजे, पोटरीपर्यंतचा भाग झाकणारे हिवाळी बूट, जाड पँट, थर्मल, जॅकेट, कानटोपी, फेसमास्क अशा गोष्टी सोबत न्या आणि त्यांचा व्यवस्थित वापर करा. प्रवासाला निघण्यापूर्वी हातापायांना टायगर बाम किंवा झंडू बाम चोळून घेतल्यासही गारवा कमी लागतो. थंड हवेच्या ठिकाणी जाताना कानात कायम कापूस ठेवा. जेणेकरून थंड हवेमुळं तुमच्या कानांना वेदना होणार नाहीत आणि हो…. रायडिंगला निघता निघता वर्तमानपत्र सोबत न्यायला कधीच विसरु नका. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विमानात असते ‘ही’ सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली

Aeroplane secret room : विमानानं प्रवास करत असताना तिकीट काढण्यापासून संपूर्ण प्रवास आणि त्यानंतर अगदी …

Vivo Y58 5G अखेर भारतात लाँच, 50MP कॅमेऱ्यासह 6000mAh ची बॅटरी, किमत फक्त…

Vivo Y58 5G Price in India: विवोने भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा …