‘ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे’, मराठी चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज


मराठीतील एका ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरसाठी राज ठाकरे यांनी आवाज दिलाय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या बरेच चर्चेत आहेत. मराठी चित्रपट सृष्टी आणि राज ठाकरे यांचं तसं फार जुनं नातं आहे. पण आता त्यांनी मराठीतील एका ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरसाठी आवाज दिलाय. राज ठाकरे यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या व्हिडिओमधील राज ठाकरे यांच्या दमदार आवाजानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

मराठीतील आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘हरहर महादेव’च्या टीझरसाठी राज ठाकरे यांनी आवाज दिलाय. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. “जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..हर हर महादेव,” ही राज ठाकरेंच्या आवाजातील वाक्यं ऐकल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो.

आणखी वाचा- Video- रेणुका शहाणे यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, झी मराठीच्या ‘या’ कार्यक्रमात दिसणार वेगळ्या भूमिकेत

अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यात राज ठाकरे यांचा आवज सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. झी स्टुडिओजनं आतापर्यंत एकापेक्षा एक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. याच पंक्तीत आता ‘हर हर महादेव’ हे आणखी एक नाव सहभागी होणार आहे. 

हेही वाचा :  वसई-भाईंदर प्रवासात होणार 55 मिनिटांची बचत, लवकरच रो-रो सेवेचं उद्घाटन



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …