प्रभाससोबत काम करण्याची तुम्हालाही मिळू शकते संधी, ‘येथे’ पाठवा Resume

Prabhas Giving Big Opportunity : दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार अशी ओळख असलेला प्रभास हा सातत्याने विविध कारणांनी चर्चेत आहे. प्रभासचा बाहुबली  हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामुळेच त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. सध्या प्रभास हा ‘कल्कि 2898 एडी’ (Kalki 2898 AD) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभासच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कल्की या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. आता प्रभासने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. 

अभिनेता प्रभासचा कल्कि हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पाटनी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रभास वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वसामान्यांना त्याच्यासोबत काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. या चित्रपटाचे निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. 

‘कल्कि’ या चित्रपटाची निर्मिती वैजयंती मूव्हीसतर्फे केली जात आहे. ‘वैजयंती मूव्हीस’ने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सर्वसामान्य लोकांनाही चित्रपटाचा एक भाग बनता येऊ शकते, असे सांगितले आहे. 

हेही वाचा :  उत्तर महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचा इशारा, अन्यत्रही पावसाची शक्यता

‘येथे’ पाठवा Resume

‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाला फ्रिलांस साऊंड डिझायनर आणि एडिटर्सची गरज आहे. त्यामुळे जर तुम्हाला साऊंड डिझाईनिंगबद्दल माहिती असेल तर तुम्ही आमची टीम जॉईन करु शकता. यासाठी तुम्हाला [email protected] यावर तुमची माहिती पाठवावी लागेल, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Prabhas Giving Big Opportunity

हेही वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीने अयोध्या प्राणप्रतिष्ठापना दिवशी केलं असं काम, पाहून तुम्हीही कराल कौतुक

दरम्यान प्रभासचा ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभाससोबत कमल हासन, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानीही झळकणार आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे नवा प्रोजेक्ट के असं ठेवण्यात आलं होतं. पण त्यानंतर या चित्रपटाच्या नावात बदल करत हे नाव कल्कि 2989 एडी असं करण्यात आलं आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होईल, असं म्हटलं जात आहे. ‘कल्कि 2898 एडी’ हा चित्रपट येत्या 9 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …