लोकांनी इंग्रजी येत नाही म्हणून टिंगलटवाळी केली; पण अथक परिश्रमाने सुरभी बनली IAS!

UPSC IAS Success Story : युपीएससीची परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यात काही मोजकेच जण यशस्वी होतात. तर काही अपयशी ठरतात. अशीच युपीएससीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सुरभी गौतम यांची यशोगाथा नक्की वाचा… सुरभी गौतम ही मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातली आहे. तिची आई डॉ. सुशीला गौतम या हायस्कूलच्या शिक्षिका आहेत. तर तिचे वडील एमपीच्या मैहर कोर्टात कायद्याचा अभ्यास करतात. तिचे शालेय शिक्षण तिच्या गावातील एका सरकारी शाळेत पूर्ण झाले. जिथे मूलभूत सोयी देखील उपलब्ध नव्हत्या. तिची शाळा हिंदी माध्यमाची शाळा होती. तिला दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९३.४% मिळाले. तिने विज्ञान आणि गणित या दोन्ही विषयात १०० गुण मिळवले. ती दहावी व बारावीच्या दोन्ही परीक्षेत गुणवत्ता यादीत आली.

बारावीनंतर सुरभीने राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिली आणि चांगली कामगिरी केली. उच्च शिक्षणासाठी ती शहरात गेली. तिने भोपाळमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये या विषयात अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. जिथे तिला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदक देखील मिळाले आणि विद्यापीठात प्रथम स्थान मिळविले.या संपूर्ण प्रवासात तिला नीट इंग्रजी न बोलल्याने वर्गात तिची अनेकदा टिंगलटवाळी करण्यात आली. तरीही, तिने हार मानण्यास नकार दिला आणि तिने यश‌ हे मिळवलेच. आयएएस अधिकारी सुरभी गौतमने स्वतःशी इंग्रजीत बोलणे सुरू केले आणि तिच्या भाषेतील प्रभुत्व सुधारले आणि दररोज किमान १० शब्दांचे अर्थ जाणून घेतले.

हेही वाचा :  IREL Bharti 2024 : 10वी/ITI/12वी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरीची संधी, पगार 88000 पर्यंत

याचा परिणाम असा झाला की आयएएस अधिकारी सुरभी गौतम तिच्या पदवीच्या पहिल्या सत्रात अव्वल ठरली आणि तिला महाविद्यालयीन काळात पुरस्कारही मिळाला.अभियांत्रिकी पूर्ण होताच कॉलेज प्लेसमेंटद्वारे टीसीएसमध्ये नोकरी मिळवली परंतु नागरी सेवांच्या इच्छेमुळे तिने अर्धवट सोडले. त्यानंतर तिने अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. जेव्हा सुरभी गौतम ही सुवर्णपदक विजेती आणि विद्यापीठ टॉपर ठरली. तेव्हा तिने ठरवले आता युपीएससीची परीक्षा पण उत्तीर्ण व्हायचे. या दृष्टीने तिचा अभ्यास चालू झाला. हिने नागरी सेवा परीक्षा देण्यापूर्वी अनेक परीक्षांमध्ये यश मिळविले होते. त्यामुळे परीक्षेच्या बाबतीतला तिचा पाया मजबूत झाला होता.

सुरभी गौतमने BARC मध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून एक वर्ष काम देखील केले आहे. GATE, ISRO, SAIL, MPPSC PCS, SSC CGL, दिल्ली पोलीस आणि FCI सारख्या परीक्षाही तिने उत्तीर्ण केल्या. याशिवाय, २०१३ च्या IES परीक्षेत तिने AIR 1 मिळवला. २१०३ मध्ये तिची IES सर्व्हिसेससाठी निवड झाली होती आणि यात ती प्रथम आली होती. तिने २०१६ मध्ये AIR ५० सह IAS परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनली. IAS सुरभी गौतम सध्या अहमदाबादच्या विरमगाम जिल्ह्यात जिल्हा विकास अधिकारी म्हणून आणि सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा :  RPF : रेल्वे संरक्षण दल अंतर्गत 4660 जागांसाठी मेगाभरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरच्यांचा पाठिंबा आणि अभ्यासातील सातत्य; रणजित रणनवरे बनला पीएसआय!

MPSC PSI Succes Story : रणजितने लहानपणापासून वडिलांचे कष्ट बघितले होते. त्या कष्टाची जाणीव झाल्यावर …

रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ-दिव्यांग मालाचे एमपीएससीत यश

MPSC Success Story : आपण सर्वसामान्य माणसं कोणत्याही थोड्या वाईट परिस्थितीत यश आले नाहीतर डगमगून …