ठाणे रेल्वे स्टेशनवरील भार हलका होणार; मध्य रेल्वेवर उभारण्यात येणार नवे स्थानक

Extended Thane Railway Station: मुंबईची लाइफलाइन म्हणजे लोकल. दररोज लाखो प्रवासी  प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक उभारण्यात येणार आहे. ठाणे ते मुलुंड या दरम्यान हे स्थानक उभारण्यात आहे. या बाबतच्या कामाला गती मिळाली असून जर काम लववर पूर्ण झाले तर 2025 मध्ये मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक कार्यरत होण्याची शक्यता आहे. 

मुलुंड आणि ठाण्याच्यामध्ये स्मार्ट सीटीच्या प्रकल्पाअंतर्गंत कोपरी स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाला जोडणाऱ्या तीनही उन्नत रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. तसंच, महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील सामंजस्य कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 3 मार्च 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जमीन हस्तांतरित करण्यात आल्याची परवानगी दिली होती. त्यानंतर ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान असलेल्या मनोरुग्ण रुग्णालयाच्या प्रस्तावित जागेवर नवे स्थानक उभारण्यात येण्याची घोषणा करण्यात आली. एप्रिलमध्ये रुग्णालयासाठी 14.83 एकरचा भूखंड राज्य सरकारने महानगरपालिकेला हस्तांतरित केला. ठाणे स्थानकातील गर्दीचा ताण कमी होण्यासाठी नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे. 

ठाणे स्थानकातून जवळपास दररोज 6 लाख रोज प्रवास करतात. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गंत या नव्या स्थानकावर144.80 कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन स्थानकामुळं घोडबंदर येथील नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे. डिसेंबरपर्यंत या स्थानकाबाबतचे 22 टक्के काम पूर्ण झाले आहे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले आहे. या नवीन स्थानकात तीन प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे. मुंबई सीएसटी आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या आणि ठाण्याहून निघणाऱ्या लोकल नव्या स्थानकावरून सोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा :  बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, 'अल निनो' सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका

कसं असेल नवीन स्टेशन?

– नवीन स्थानकाचा डेक तीन स्वतंत्र उन्नत पदपथांनी जोडला जाईल.

– ज्ञान साधना महाविद्यालयासमोरून नवीन स्थानकापर्यंतचा २७५ मीटर लांबीचा रस्ता असेल

– मनोरुग्णालयासमोरून नवीन स्थानकापर्यंत ३२७ मीटर लांबीचा मार्ग असणार आहे.

– मुलुंड एलबीएस टोल प्लाझा ते नवीन स्थानकापर्यंत ३२५ मीटर लांबीचा मार्ग असेल.

– तिन्ही मार्ग 8.50 मीटर रुंद असतील.

– स्थानक 275 मीटर लांब आणि 34 मीटर रुंद असेल

– जमिनीपासून सुमारे 9 मीटर उंचीवर असेल.

– स्थानकाजवळ ठाणे महानगरपालिका परिवहन (TMT) बस थांबा असेल

– स्थानका खालील रस्ता रिक्षा आणि इतर वाहनांसाठी असेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

10वी नंतर तुमच्यासमोर ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पर्याय, नोकरी मिळण्याच्या संधी अधिक

Vocational Courses After 10th: दहावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थी करिअरच्या विविध मार्ग शोधायला लागतात. बहुतांश विद्यार्थी …

Google Maps ने दाखवला असा रस्ता, कार थेट नदीत, चार जण बुडाले… पाहा नेमकं काय घडलं?

Google Maps Accident : देशात कुठेही प्रवास करायचा म्हटले की, सर्वात आधी गुगल मॅप ची …