डिसेंबरच्या अखेरीस ‘इतके’ दिवस बॅंक बंद, तुमचे व्यवहार आताच घ्या उरकून!

Bank Holidays in December: 2023 वर्षे संपायला काही दिवसच राहिले आहेत. शाळा, कार्यालयांना ख्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या आहेत. अनेकजण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. अशावेळी तुम्हीदेखील तुमचे बॅंक व्यवहार लवकरात लवकर उरकून घ्या. कारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकाना सलग सुट्टी असणार आहे. सोमवारी 25 डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. यामुळे आठवड्याची सुरुवातच सुट्टीने होत आहे.  त्याआधी 23 डिसेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे हा एक मोठा विकेंड ठरणार आहे. आता डिसेंबर 2023 संपायला फक्त 9 दिवस उरले आहेत पण यातील 7 दिवस बँका बंद राहणार आहेत. जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर ते आजच पूर्ण करायला हवीत. 

येत्या काही दिवसात अनेक सुट्ट्या येणार आहेत, त्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण करा. नाताळच्या सुट्टीत कोणत्या राज्यांमध्ये सलग किती दिवस बँका बंद राहतील याबद्दल येथे जाणून घ्या. शेवटच्या दिवसात बँकेत खूप गर्दी असू शकते, त्यामुळे जी कामे ऑनलाइन पूर्ण करता येतील, ती घरबसल्या पूर्ण करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. 

हेही वाचा :  रावणाने पूर्ण केली शेवटची इच्छा, मरण्यापूर्वी खाल्ला गुटखा; पाहा भन्नाट Video

या तारखांना बँका बंद 

23 डिसेंबर 2023- चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
24 डिसेंबर 2023- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
25 डिसेंबर 2023- ख्रिसमसनिमित्त देशभरात बँका बंद राहतील.
26 डिसेंबर 2023- ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमुळे आयझॉल, कोहिमा, शिलाँगसह इतर काही राज्यांमध्ये सुट्टी असेल.
27 डिसेंबर 2023- ख्रिसमसमुळे कोहिमामधील बँका बंद राहतील.
30 डिसेंबर 2023- शिलाँगमध्ये यु कियांगमुळे बँका बंद राहतील.
31 डिसेंबर 2023- रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी

कामे ऑनलाइन पूर्ण करण्याचा पर्याय 
पूर्वी बॅंक बंद असल्या की ग्राहकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागायचे. पण आता तंत्रज्ञान अद्ययावत झाल्याने बँका बंद असल्या तरी पूर्वीइतका त्रास होत नाही. तुम्ही बहुतांश कामे ऑनलाइनही पूर्ण करू शकता. तुम्हाला जर एखाद्याला पैसे पाठवायचे असतील किंवा EMI जमा करायचा असेल तर तुम्ही हे सर्व फक्त ऑनलाइन करू शकता.

आता जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या दुकानात UPI आणि ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय एटीएममधून आवश्यक असलेली रोख रक्कम अगोदरच काढा. यामुळे तुम्हाला कॅशची अडचण येणार नाही.

बँकेत जाण्याचे नियोजन करण्यापूर्वी कॅलेंडर तपासा
ख्रिसमस सण लक्षात घेता, वेगवेगळ्या राज्यांप्रमाणे सुट्टी बदलू शकते.  तुम्हाला बँकांशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करायची असतील आणि ती ब्रांचमध्ये गेल्याशिवाय करता येत नसतील तर सुट्ट्यांचे कॅलेंडर नक्की तपासा. काही राज्यांमध्ये ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी असते. तसेच महिनाअखेर असल्याने काही वेळा बँकांद्वारे व्यवहाराची वेळ मर्यादित असते. हे सर्व आधीच तपासून घ्या.

हेही वाचा :  एका दिवसात 24 नव्हे 25 तास? कसा आणि कधीपासून दिसेल बदल? जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्था धाब्यावर! माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला… गुन्ह्यांमध्ये वाढ

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा आवाज कमी करायला सांगितल्याचा राग आल्याने तीन …

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …