सैराट झालं जी…रिंकूच्या देशी लुकवर चाहते फिदा, म्हणतात इन्स्टाग्रामची क्वीन

‘सैराट’ चित्रपटातून सगळ्यांची लाडकी झालेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या लुकमधील फोटो पोस्ट करत असते. नुकतेच तिने सलवार कुरत्यामधील शेअर केलेले फोटो हे तुफान व्हायरल झाले आहे. रिंकूचा हा देसी अंदाज सर्वांनाच आवडलेला दिसून येत आहे. तुम्हीदेखील रिंकूच्या या लुकवरून प्रेरणा घेऊन तिची फॅशन कॅरी करू शकता. (फोटो सौजन्य – @iamrinkurajguru Instagram)

​दुपट्टा तेरा…​

​दुपट्टा तेरा…​

रिंकूने अबोली रंगाचा सलवार कुरता घातला असून त्याची रंगाचा दुपट्टा अर्थात ओढणी त्यावर घेतली आहे. पूर्ण देसी वाईब्स तिच्या या पेहरावातून दिसून येत आहे. एखाद्या कार्यक्रमाला असा लुक करता येईल. साडी नेसणं अवघड जात असेल तर या फ्रेश अबोली रंगाचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता.

​फुल स्लीव्ह्ज आणि परफेक्ट रंग​

​फुल स्लीव्ह्ज आणि परफेक्ट रंग​

रिंकूने घातलेला हा कुरता फुल स्लीव्हज शिवलेला असून यासह क्रम्प्ड असा दुपट्टा खूपच परफेक्ट मॅच होत आहे. अद्विका फॅशनमधून घेतलेला हा सलवार कुरता रिंकूच्या स्किन टोनलादेखील परफेक्ट मॅच झाला असून रिंकूचे सौंदर्य अधिक खुललेले दिसून येत आहे.

हेही वाचा :  घरी WiFi बसवायचा विचार करताय? हे स्वस्तात मस्त Broadband Plan एकदा पाहाच!

(वाचा – दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात रेखाचा बोलबाला, ‘मलमली तारूण्य’ म्हणावे असे आरस्पानी सौंदर्य, आलिया पडली फिकी)

​गडद इमिटेशन कानातले​

​गडद इमिटेशन कानातले​

अबोली रंगाला साजेसे असेच गडद रंगातील लाल कानातले रिंकूने या ड्रेससह मॅच केले आहेत. तर मोकळे केस आणि कपाळावरील टिकलीमुळे अगदी टिपिकल देशी स्वॅग वाटत आहे. तसंच रिंकूचा चेहरा अगदीच मराठमोळा यामध्ये दिसून येत आहे. रिंकूने यासह डोळ्यात लेन्सदेखील लावल्याचा भास होत आहे.

(वाचा – दिशाने केले असे फोटो पोस्ट की पाहातच राहावे, ग्लॅम डॉलवरून नजरच हटेना!)

​मॅट मेकअप​

​मॅट मेकअप​

अबोली रंगाच्या ड्रेसला साजेल असा मेकअप रिंकूने निवडला असून त्याच शेडमधील लिपस्टिक, आयशॅडो आणि हायलायटरचा वापर केलेला दिसून येत आहे. तर डोळ्यात काजळ आणि आयलॅशेस मस्कारा लावत तिने हा लुक पूर्ण केल्याचे दिसून येत आहे. या फोटोत तिने केस बांधल्यामुळे चेहरा अधिक खुललेला दिसून येतोय.

(वाचा – कोण म्हणेल माधवीला खलनायिका? कातिल अदांवर चाहते फिदा)

​एक लाजरान् साजरा मुखडा​

​एक लाजरान् साजरा मुखडा​

रिंकूकडे पाहिल्यानंतर नजरच हटत नाहीये. अनेक चाहत्यांनी तिला आपला जीव म्हटलं आहे तर अनेकांनी तिला इन्स्टाग्रामची क्वीन असल्याचेही म्हटलं आहे. रिंकूने किमान एकतरी रिप्लाय द्यावा असंही तिला चाहते विनंती करताना दिसून येत आहेत.
रिंकूचा हा भारतीय लुक आम्हाला तर आवडला आहे, तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा आणि तुम्हीही एखाद्या कार्यक्रमाला अशा लुकची प्रेरणा घेऊ शकता.

हेही वाचा :  आर्चीनं शेअर केला 'बेशरम रंग' गाण्यावरील व्हिडीओ; नेटकरी म्हणाले...

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …