बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्याकरता सर्वोत्तम ठरते ‘ही’ भाजी, हाडांना १०० टक्के करेल मजबूत

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लोकं अनेकदा आहारात अनेक पदार्थांचा समावेश करतात. मात्र त्यांना त्या पदार्थाच्या गुणधर्माबद्दल सगळी माहिती नसते. अशीच एक भाजी आहे जी पालेभाजी प्रकारात मोडते. ज्या भाजीचा आहारात सर्रास समावेश केला जातो. पण त्याचे हेल्थ बेनिफिट्स मात्र माहित नाहीत. या भाजीचं नाव आहे अमरंथ म्हणजे चवळी.

चवळी हे फायबर, ग्लूटेन फ्री, अत्यावश्यक अमीनो अॅसिड, लिपिड्स, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियमने समृद्ध असलेले अन्न आहे. हे अँटी-हायपरटेन्सिव्ह, अँटी-ऑक्सिडंट, अँटीथ्रोम्बोटिक आणि अँटी-प्रोलिफेरेटिव्ह एजंट म्हणून काम करून शरीराला अनेक प्रकारे फायदे देते.

आयुर्वेद तज्ञ डॉ. डिंपल जांगडा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही महत्वाची माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी चवळीत असणाऱ्या असंख्य फायद्याच्या पोषकतत्वांबद्दल सांगितलं आहे. त्यांच्यामते चवळी ही सुपरफूड म्हणून ओळखली जाते. ही चवळी हार्ट, बोन आणि डायजेस्टिव सिस्टमकरता अतिशय फायदेशीर मानली जाते. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

चवळी ज्याला अमरंथ किंवा राजगिरा असेही म्हणतात. यामध्ये मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत आहे. जो हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. एवढेच नव्हे तर ते फिनोलिक ऍसिडमध्ये समृद्ध आहे. कोणत्याही प्रकारचा रोग टाळण्यास चवळी या भाजीची मदत करते. चवळी हृदयाच्या स्नायूंना बळकट करण्यास सक्षम आहे. चवळीमध्ये रुटिन आणि निकोटीफ्लोरिन सारखे फायटोकेमिकल्स असतात. जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. चवळीच्या तेलामध्ये असंतृप्त फॅटी ऍसिड, टोकोफेरॉल आणि पॉलीफेनॉल असतात जे कार्यात्मक अन्नाचे उत्तम उदाहरण आहेत. याव्यतिरिक्त, हे एकूण कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, लिपोप्रोटीन (LDL) आणि कमी लिपोप्रोटीन (VLDL) लक्षणीयरीत्या कमी करते.

हेही वाचा :  307 चा बदला 302 ने; पुण्यात मध्यरात्री टोळक्याने केली तरुणाची निर्घृण हत्या

(वाचा – Weight Loss Journey : 95 किलो वजनामुळे कंबर-गुडघे दुखीचा त्रास, चक्क तूप आणि सोया खाऊन केला 28 किलो वेट लॉस))

आयुर्वेदात चवळीचे फायदे

​मजबूत हड्यांकरता करा याचे सेवन

चवळीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील मुबलक प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. ज्या स्त्रियांना ऑस्टियोपोरोसिस आहे त्यांनी आहारात याचा नक्की समावेश करावा. चवळीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या लाइसिनमुळे कॅल्शियम शोषण्यास मदत होते. त्यात एल-आर्जिनिन देखील आहे. जे ऑस्टियोक्लास्ट सेलची ऍक्टिविटी नियंत्रित करते. चवळीची भाजी खाणे निरोगी हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.

(वाचा – सतत सर्दी होतेय तर आहारात 3 मसाल्यांचा आवर्जून करा समावेश, हृदयाचे आजार-हाय ब्लड शुगरसह १० आजार होतील हद्दपार)

​पचनाकरता लाभदायक

चवळीमध्ये भरपूर फायबर असते. चवळीमुळे ऊर्जा पातळी आणि पचन सुधारण्यास मदत होते. चांगल्या पचनसंस्थेसाठी चवळीच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, ते बद्धकोष्ठता टाळण्यास देखील मदत करते. ड्युओडेनल पेप्टिक अल्सर आणि हेलिकोबॅक्टर पायलोरीद्वारे प्रेरित तीव्र जठराची सूज असलेल्या लोकांना चवळीच्या तेलाचा फायदा होतो.

(वाचा – ‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी ज्याची बिअर सारखी चव, ८ फायदे ऐकून लोकं कोणत्याही किंमतीत घ्यायला तयार))

हेही वाचा :  Weight Loss: काकडी खाण्याने वजन कमी होते का? उन्हाळ्यात काकडीचा उपयोग

​एनोरेक्सियासारख्या रोगांवर फायद्याचं

अनेक लोक अनहेल्दी फूड आणि पोषकतत्वांसंबंधी वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जात असाल तर त्यांच्यासाठी हे अतिशय लाभदायक आहे. लहान मुलं, किशोरवयीन मुलं, वयस्कर आणि वृद्ध ज्यांना एनोरेक्सिया सारखा आजार आहे त्यांच्यासाठी ते अधिक फायदेशीर आहे.

(वाचा – Women Health Tips : पीरियड्स ब्लडमधून का येतो घाणेरडा वास? ५ कारण महत्वाची, अशी मिळवा या दुर्गंधीपासून सुटका)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …