आग ओकणाऱ्या सूर्यासमोर कसा टिकला इस्रोच्या Aditya-L1 चा कॅमेरा? पाहा तो काम तरी कसा करतो

ISRO Aditya L1 SUIT: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं मागच्या काही काळापासून अेक अवकाशविषयक मोहिमा राबवल्या आणि यापैकी अनेक मोहिमांमध्ये इस्रोला यशही मिळालं. यामध्ये मैलाचा दगड ठरलेली मोहिम होती ती म्हणजे चांद्रयान 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोनं थेट सूर्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि आदित्य एल-1 ही मोहिम हाती घेतली. 

इस्रोच्या याच आदित्य एल-1 नं आता SUIT च्या माध्यमातून काही फूल वेवलेंथ फोटो टीपले. 200 ते 400 नॅनोमीटरच्या दरम्यान असणारी ही छायाचित्र इस्रोनं ट्विटरवर शेअरही केले. SUIT नं टीपलेली ही छायाचित्र अतिशय खास असण्यामागचं कारण म्हणजे ही छायाचित्र 11 रंगांमध्ये आहेत. राहिला प्रश्न आग ओकणाऱ्या सूर्याची छाया टीपण्याची किमया नेमकी कोणत्या कॅमेरानं केली आणि तो कसा काम करतो याबाबतची, तर ते स्पष्ट करणारा व्हिडीओसुद्धा इस्रोनं सर्वांसाठी शेअर केला आहे. 

SUIT म्हणजे काय? 

इस्रोच्या आदित्य एल 1 स्पेसक्राफ्टमध्ये अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलिस्कोप (Solar Ultraviolet Imaging Telescope- SUIT)  लावण्यात आला आहे. ज्याच्या माध्यमातून सूर्याची फोटोस्पेयर  आणि क्रोमोस्फेयर छायाचित्र टीपण्यात आली आहेत. यामध्ये फोटोस्पेयर म्हणजे सूर्याचा पृष्ठ आणि क्रोमोस्फेयर म्हणजे पृष्ठ आणि बाहेरील वातावरणामध्ये असणारा एक पातळ थर. क्रोमोस्फेयर सूर्याच्या पृष्ठापासून 2000 किमी वरच्या बाजूस आहे. 

SUIT इतका महत्त्वाचा का? 

हेही वाचा :  चांद्रयान 3 ला चंद्रावर मोठा धोका, फक्त 'ती' एक चूक अन्...; ISRO प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं

SUIT ला इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स, उदयपुर सोलर ऑब्जरवेटरी, तेजपुर यूनिवर्सिटी, मनिपाल एकेडमी ऑफ हायर एजुकेशन (MAHE), इंटर-यूनिवर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी एंड एस्ट्रोफिजिक्स (IUCAA), सेंटर फॉर एक्सीलेंस इन स्पेस साइंस इंडियन (CESSI) आणि इस्रोच्या काही वैज्ञानिकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर तयार केला आहे. आदित्य एल 1 वर असणाऱ्या विविध पे लोडपैकी तोसुद्धा एक आहे, ज्यामुळं तो अतिशय महत्त्वाचा आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

वीज, पाणीटंचाई अन् उन्हाचे चटके, इरसालवाडी दरडग्रस्तांची परवड सुरूच; पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेशाचे स्वप्न हवेतच?

प्रफुल्ल पवार, झी मीडिया  Irshalwadi landslide: 19 जुलै 2023 रोजी रायगडमधील इरसाल वाडी या आदिवासी …

बालसुधार गृह म्हणजे काय, तिथे मुलांना काय सुविधा मिळतात? सर्व काही समजून घ्या!

Pune Accident News:  पुणे अपघात प्रकरणातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा जामीन बालहक्क न्यायालयाने फेटाळला आहे. …