भाजप राहुरी तालुका अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश


राज्यमंत्री तनपुरे यांचा भाजप नेते शिवाजी कर्डिले यांना धक्का

नगर : भाजपने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) माध्यमातून लक्ष्य केल्याचा आक्षेप घेतला जात असतानाच दुसरीकडे राज्यमंत्री  तनपुरे यांनी जिल्हा भाजपला धक्का दिला आहे. राहुरी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणत हा धक्का दिला. त्यामुळे भाजप नेते तथा माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनाही हादरा बसला आहे.

अमोल भनगडे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश आज, बुधवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. भनगडे यांच्यासह उपसरपंच पोपटराव कोबरणे, गणेगाव सोसायटीचे अध्यक्ष बापू कोबरणे, माजी उपसरपंच गंगाधर कोबरणे, मंजाबापू कोबरणे, सोसायटीचे सदस्य भाऊसाहेब कोबरणे, बबनराव कोबरणे यांनीही प्रवेश केला. यावेळी सुयोग नालकर, अनिल घाडगे, गंगाधर हारदे, बापू जगताप, पप्पू माळवदे, भारत भुजाडी, किरण गव्हाणे, संतोष आघाव, राजेंद्र बोरकर आदी उपस्थित होते. या घडामोडींमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली.

चार दिवसापूर्वी भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष व उपसरपंच दीपक वाबळे, वरिशदे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, आता थेट तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तालुका भाजपला िखडार पडल्याचे मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार शिवाजी कर्डिले राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा झडत आहेत.  त्यातच आता तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी प्रवेश केल्याने अनेकांच्या नजरा आता कर्डिले यांच्याकडे वळाल्या आहेत. कर्डिले यांचे कट्टर समर्थक राहुरीचे नगरसेवक शहाजी जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता तालुकाध्यक्षांनी प्रवेश केल्याने कर्डिलेंबाबत चर्चेला उधाण आले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, सेवा संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे.

हेही वाचा :  मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?

The post भाजप राहुरी तालुका अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …