Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…


रशियन राष्ट्राध्यक्षांनीच युक्रेनविरोधातील युद्ध टाळता येणार नाही असं म्हणत सात दिवसांपूर्वीच युक्रेनवर आक्रमण करण्याचे आदेश आपल्या लष्कराला दिले होते.

रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन सध्या चर्चेत आहेत. आता पुतिन यांच्या पाठोपाठ त्यांचं कुटुंबही चर्चेत आलं आहे. रशियामधील एका प्राध्यापकाने केलेल्या दाव्यानुसार पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबाला एका जमीनीखालील शहरामध्ये म्हणजेच अंडरग्राउण्ड सिटीमध्ये पाठवलं आहे. हे शहर अण्वस्त्र हल्ल्यापासूनही (nuclear attack) सुरक्षित असल्याचा दावा केला जातोय. प्राध्यापकाने केलेल्या दाव्यानुसार पुतिन यांनी आपल्या कुटुंबियांना सायबेरियामधील एका गुप्त ठिकाणी हलवलं आहे.

या प्राध्यापकाने पुतिन यांच्याबद्दल इतरही काही धक्कादायक खुलासे केलेत. यासंदर्भात डेली मेलने वृत्तांकन करताना मॉस्को स्टेट इंस्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशनचे प्राध्यापक वालेरी सोलोवी यांच्या वक्तव्यांचा आधार घेतलाय.

अहवालामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना अण्वस्त्र हल्ले होण्याची शंका वाटतेय म्हणूनच अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी कुटुंबाला या ठिकाणी पाठवलंय. प्राध्यापक सोलोवी यांनी अनेक धक्कादायक खुलासा केलेत. सोलोवी यांचा पुतिन यांच्या प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद होत असल्याने अनेक गुप्त गोष्टी त्यांना ठाऊक असल्याचं मानलं जातं. सोलोवी यांच्याकडे रशियन नेत्यांच्या हलचालींबद्दल बरीच गुप्त माहिती असल्याचं सांगितलं जातं. जमिनीखालील हे शहर सायबेरियामधील अल्ताई पर्वतांमध्ये (Altai Mountains) असल्याचं सांगितलं जातं. मात्र या अहवालामध्ये जागेचा थेट उल्लेख नाहीय.

हेही वाचा :  White House मध्ये मोदींच्या डिनर टेबलवर चक्क Pate Wine! एका बॉटलची किंमत...

प्राध्यापकने दिलेल्या माहितीनुसार पुतिन यांनी आपल्या कुटुंबियांना उच्च तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आलेल्या बंकरमध्ये पाठवलं आहे. हे बंकर सायबेरियामधील अल्ताई पर्वतांमध्ये आहे. या बंकरमध्ये सर्व सुखसोयी आणि अद्यावत तंत्रज्ञान आहे. अण्वस्त्र हल्ल्यांची परिस्थिती निर्माण झाली तर बंकरमधील व्यक्ती सुरक्षित राहतील यासाठी हा बंकर डिझाइन करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

सायबेरियामधील हा बंकर असणारा प्रांत मंगोलिया, काझिकस्तान आणि चीनच्या सीमांना लागून असल्याने अगदीच आपत्कालीन परिस्थितीमध्ये देशामधून पलायन करता येण्याच्या दृष्टीने योग्य असल्याचं सांगितलं जातंय. रशियन राष्ट्राध्यक्षांनीच युक्रेनविरोधातील युद्ध टाळता येणार नाही असं म्हणत सात दिवसांपूर्वीच युक्रेनवर आक्रमण करण्याचे आदेश आपल्या लष्कराला दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत युक्रेनमध्ये रशियन आणि युक्रेनियन लष्कर लढत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …