White House मध्ये मोदींच्या डिनर टेबलवर चक्क Pate Wine! एका बॉटलची किंमत…

PM Modi At White House State Dinner: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांच्या पाहुणचारासाठी खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन बरीच मेहनत घेताना दिसले. मोदींच्या या तीन दिवसीय दौऱ्याच्या निमित्तानं त्यांच्यासाठी खास स्नेहभोजाचं म्हणजेच State Dinner चं आयोजन करण्यात आलं होतं. इथं बायडेन यांच्या पत्नीनं व्हाईट हाऊसमधील Executive Chef च्या जोडीनं खास बेत आखल्याचं पाहायला मिळालं. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भोजन कार्यक्रमातील पदार्थांची रेलचेल सर्वांनाच भारावणारी होती. 

पंतप्रधान मोदींसाठी क्रिस्प्ड मिलेट केक, समर स्क्वाश, मॅरिनेटेड मिलेट, ग्रिल्ड कॉर्न कर्नेल सॅलड, कम्प्रेस्ड वॉटरमेलन , अॅवोकाडो सॉस, स्टफ्ड पोर्टोबेलो मश्रूम अशा आणि इतरही काही खास पदार्थांचा बेत होता. यामध्ये प्रत्येक पदार्थ हा दिसायला आणि चवीला तितकाच सुरेख ठरला. पण, या साऱ्यामध्ये लक्ष वेधलं ते म्हणजे ‘पटेल रेड ब्लेंड 2019’ या वाईननं. 

मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या State Dinner मध्ये सारंकाही इतकं खास असताना आणि शेफ नीना कर्टिस यांनी डिझाईन केलेला संपूर्ण मेन्यू शाकाहारी असतानाच ही वाईन इथं काय करत होती हाच प्रश्न अनेकांना पडला. अखेर या पटेल वाईनचा उलगडा झाला आणि संपूर्ण जगभरात तिचीच चर्चा सुरु झाली. 

हेही वाचा :  पुणे-कोल्हापूर विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन

पटेल वाईन इतकी खास का? 

Business Today च्या वृत्तानुसार पटेल रेड ब्लेंड 2019 ही राज पटेल यांच्या मालकीच्या नापा व्हॅली वाइनरीतील एक वाईन आहे. पटेल हे स्वत: मुळचे भारती असून, ते बऱ्याच वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांची रेड ब्लेंड 2019 ही वाईन जो मर्लोट आणि कॅबरनेट सॉविनन यांचं एक सुरेख मिश्रण आहे. या वाइनरीच्या माहितीनुसार तिची एक Bottle साधारण 75 डॉलर इतक्या किमतीला मिळते. आता तिचा एक ग्लास नेमका किती किमतीला असेल याचा अंदाज मात्र तुम्हीच लावा. 

व्हाईट हाऊसकडून राज पटेल यांना त्या स्टेट डिनरच्या निमित्तानं वाईन सर्व्ह करण्याची विचारणा करण्यात आली होती. असं असलं तरीही पटेल यांना मात्र या भोजन कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. आता राहिला मुद्दा या गृहस्थांबद्दल जाणून घेण्याचा, तर थेट गुजरातशीच संबंध असणारे राज पटेल 1970 च्या सुमारास अमेरिकेत गेले. 

 

उत्तर कॅरोलिना येथे पोहोचलेल्या पटेल यांनी युसी डेविस येथे शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर रॉबर्ट मोंडावी वाइनरीमध्ये इंटर्नशिप केली. पुढे त्यांनी स्वत:चं Wine Producton सुरु केलं. साधारण 2000 च्या सुमारास त्यांनी या क्षेत्रात उडी घेतली आणि 2077 मध्ये आपल्या वाईनची पहिली सीरिज सर्वांच्या भेटीला आणली. सध्याच्या घडीला पटेल वाइनरीतून 1000 हून अधिक वाईन केसची निर्मिती केली जाते, वर्षाकाठी ही सर्वच वाईन विकली जाते. अशी ही वाईन तुम्ही कधी चाखताय? 

हेही वाचा :  ईशा अंबानी म्हणते आनंदमध्ये वडिलांची प्रतिमा दिसते,जाणून घ्या आदिया - कृष्णाच्या आईबाबांची भन्नाट लव्हस्टोरी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …