Ukraine War: पुतिन यांचा मोदींना कॉल, रशियाने केला धक्कादायक दावा; म्हणाले, “युक्रेननेच भारतीय…”


युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दुसऱ्यांदा संवाद साधला.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’ तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आला आहे. युक्रेन-रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय अडकून पडले असून, त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताने रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर रशियातर्फे हा निर्वाळा देण्यात आला आहे. याचसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये चर्चा झाल्याचंही भारतातील रशियन दूतावासाने स्पष्ट केलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: “तिसरं विश्वयुद्ध झालं तर अण्वस्त्रांचा वापर होईल आणि…”; रशियाचं वक्तव्य

भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर रशियाचे भारतातील नवे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी स्पष्ट केले, की, रशिया भारतीयांच्या युक्रेनमधून सुरक्षित स्थलांतरासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग तयार करत आहे. युक्रेनच्या खर्कीव्ह शहरात रशियाच्या हल्ल्यात २१ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी रशिया करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भारतातील रशियन दूतावासाने ट्विटरवरुन युक्रेननेच भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा दावा केलाय.

हेही वाचा :  viral trending : अजगराने माकडाला घातला विळखा..समोरून आली वानरसेना...पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का...

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

भारतामधील रशियन दूतावासाने केलेल्या ट्विटनुसार, “ताज्या माहितीनुसार भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनियन सुरक्षा दलाच्या जवानांनी ओलीस ठेवलं आहे. ते त्यांचा वापर ढालीप्रमाणे करत आहेत आणि त्यांना शक्य त्या सर्व पद्धतीने युक्रेन सोडून रशियाला जाण्यामध्ये अडथळे निर्माण करतायत. या प्रकरणामध्ये मुलांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी किव्हवर आहे.”

नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दुसऱ्यांदा संवाद साधला. युक्रेनमधून भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याच्या मोहिमेबाबत मोदी यांनी पुतिन यांच्याशी चर्चा केली. पुतिन यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसंदर्भातील पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा केली, असं रशियन दूतावासाने ट्विटरवरुन म्हटलं आहे.

याआधी उभय नेत्यांमध्ये २४ फेब्रुवारीला चर्चा झाली होती. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली होती. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केलं होतं.

हेही वाचा :  Maharashtra Board HSC Result 2023 : 154 पैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के; पाहा कोणत्या विभागानं खाल्ली गटांगळीSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …