कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 उशिराने, प्रवाशांचे हाल

Konkan Railway : कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाल्याचं दिसतंय. मत्स्यगंधा एक्स्प्रेस, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस 6 तास उशिराने धावत आहेत. तर गणपती स्पेशल गाड्या 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. कालपासून गाड्यांमध्ये अडकल्याने प्रवाशांचे कमालीचे हाल होत आहेत. त्यातच कोकणात पाऊस पडत असल्याने प्रवाशांच्या हालात भर पडलीय. पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहेत. 

मध्य रेल्वेवर रेल रोको

मध्य रेल्वेवर दिवा स्थानकात प्रवाशांनी रेलरोको केलाय. रात्रभर मंगळुरू एक्स्प्रेस दिवा स्थानकात रखडलीय. त्यामुळे गाडीतल्या संतापलेल्या प्रवाशांनी रेलरोको केलाय. त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही होत आहे. रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक रखडलीय. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. दरम्यान गाडी पुणेमार्गे मंगळुरूकडे नेण्याची तयारी रेल्वेने दाखवली. मात्र गाडीतल्या प्रवाशांचा त्याला विरोध आहे. गाडी कोकण रेल्वेमार्गेच न्यावी असं प्रवाशांची मागणी आहे. 

दिव्यात संतप्त प्रवाशांनी ट्रॅक वर उतरून लोकल आणि सर्व रेल्वे वाहतूक रोखून धरले आहे..पनवेल वसई मार्गावर मालगाडी घसरल्याने काल पासून पनवेल कडे जाणारी आणि येणारी वाहतूक ठप्प आहे..त्यामुळे पनवेल मार्गे कोकण आणि पुण्यात जाणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होतोय..रात्री पासून रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या प्रवाशांचा अखेर संयम सुटला असून दिवा रेल्वे स्थानकावरील प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी थेट ट्रॅक वर उतरून गाड्या रोखून धरल्या.. तात्काळ रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रवाशांना बाजूला करण्याचे काम सुरू आहे

हेही वाचा :  भारत ते बँकॉक प्रवास होणार सोपा, विमान नव्हे तर कारनेही फिरता येणार

परतीच्या प्रवासावेळी चाकरमान्यांचे अनेक रेल्वे स्थानकात हाल झाल. मोठी गर्दी रेल्वे स्थानकावर जमा झाली. मात्र रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. गेल्या आठवड्यात गणेशोत्‍सव विशेष गाड्या दीड ते दोन तास विलंबाने धावत होत्या. पाच आणि सात दिवसांचा गणेशोत्‍सव आटोपून चाकरमानी मुंबईला रवाना होत होते. त्यावेळी प्रवाशांचे असंख्य हाल झाले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

Monsoon in Maharashtra: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या …

महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या सह्याद्रीच्या जन्माची गोष्ट

सह्याद्री आणि छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे महाराष्ट्रा लाभलेला शौर्याचा वारसा आहे. त्याचबरोबर विस्तीर्ण आणि …