मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर ‘इतके’ असणार, अधिक जाणून घ्या

Mumbai Madgaon Vande Bharat Ticket Price : मुंबई ते गोवा दरम्यान नव्याने संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat train on Konkan Railway) आता कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  27 जून रोजी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील. त्यामुळे मुंबई – मडगाव या गाडीचा समावेश आहे. दरम्यान, या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर किती असणार याची उत्सुकता होती. आता हे दर जवळपास निश्चित करण्यात आले आहेत.

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन काही काळासाठी लांबणीवर पडले आहे. आता ते 27 जून रोजी होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वात वेगावन गाडी असणार आहे. जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेसच्या तुलनेत वंदे भारतचा वेग जास्त आहे. नवीन ट्रेन प्रवासाच्या वेळेत जवळजवळ एक तास आधीच मडगावला पोहोचणार आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

मुंबई – मडगाव दरम्यान 11 थांबे

मुंबई – मडगाव (गोवा) वंदे भारत एक्स्प्रेसला 11 थांबे असतील आणि ही गाडी 586 किमी अंतर आठ तासांत पूर्ण करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटल्यानंतर ती दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे स्टॉप घेईल.

हेही वाचा :  मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ सुरु झाल्यानंतर आठवड्याभरातच महत्त्वाचा निर्णय; रेल्वे करणार मोठा बदल

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस ही शुक्रवार वगळता आठवड्यातून  सहा दिवस धावणार आहे. ती सीएसएमटी येथून पहाटे 5.25 वाजता सुटेल  आणि  दुपारी 1.15 वाजता गोव्यातील मडगाव येथे पोहोचेल. ती परतीच्या मार्गावर मडगाव, गोवा येथून दुपारी 2.35 वाजता सुटेल  आणि  10.25 वाजता मुंबईतील सीएसएमटी येथे पोहोचेल.

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर

दरम्यान, मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर किती असतील याची अनेकांना उत्सुकता आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची मानक किंमत कव्हर केलेल्या अंतरावर अवलंबून असते. EC चेअर कारची किंमत 1,100  ते  1,600  रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लास श्रेणीसाठी   2,000 ते  2,800 रुपयांच्या दरम्यान असू शकते, असे सांगण्यात येत आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार EC चेअर कारचे तात्पुरते भाडे  हे 2,915 रुपये आणि  CC  1435 रुपये आहे. मुंबई-गोव्याचे विमान भाडे हे 1,800 ते  2,100 रुपयांपर्यंत आहे. यात जीएसटीचा समावेश आहे. त्यामुळे विमान प्रवासापेक्षा जास्त भाडे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वंदे भारत ट्रेनला सात सीसी कोच आणि एक ईसी कोच असेल.  

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी इतर मार्गांवर आणखी चार वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. हे मार्ग पाटणा-रांची, बेंगळुरु-हुबली, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर आहेत. कोकण रेल्वेवर 5 जूनपासून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार होती. त्यासाठी भारतीय रेल्वेने 3 जून रोजी मडगाव स्थानकावरुन मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्याची तयारी केली होती, परंतु 2 जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे ही गाडीला उशिर होत आहे. आता 27 जूनपासून नियमित धावणार आहे.

हेही वाचा :  Indian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …