आज Google वरील Gogal लेन्समध्ये झळकणारी ही माहिला आहे तरी कोण?

Who is  Altina Tina Schinasi? आपल्या जवळपास असंख्य प्रश्नांची उत्तरं अतिशय समाधानकारक पद्धतीनं देणाऱ्या गुगलकडे माहितीचा असा खजिना आहे, जो वेळोवेळी आपल्याला थक्क करून जातो. एखादा महत्त्वाचा दिवस असो किंवा मग एखाद्या व्यक्तीनं केलेलं योगदान असो. गुगलकडे माहितीचा असा साठा आहे जो पाहता गुगलच सगळ्यात हुश्शार… अशीही मजेशीर प्रतिक्रिया अनेकजण देतात. याच गुगलनं पुन्हा एकदा संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या आहेत. निमित्त ठरतंय ते म्हणजे Google Doodle. 

सहजा आपण जेव्हा गुगल सुरु करतो तेव्हा Google हे शब्द विविधरंगी अक्षरांमध्ये आपल्यासमोर येतात. पण, खास औचित्य असल्यास गुगलही मागं राहत नाही. आजचा दिवस तसाच काहीसा. कारण, आजचं डुडलही तितकंच खास. 

4 ऑगस्ट 2023 ला तुम्ही गुगल सर्चमध्ये गेलं असता तिथं एक मोठाला चष्मा तुमच्या नजरेस पडेल, ज्यामध्ये एक महिलाही दडल्याचं लक्षात येईल. गुगलला विचारलं असता यावर त्या महिलेचं नाव अल्टीना शिनासी असल्याचं तो सांगतोय. 

गुगलच्या डुडलचा अर्थ समजून घेताना…

अल्टीना शिनासी यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल तयार केलं असून, त्या एक अमेरिकन कलाकार आणि डिझायनर आहेत. त्यांनी हार्लेक्विन चष्म्यांच्या फ्रेममुळं जगभरात एक नवी क्रांतीच आणली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तुम्हीआम्ही ज्या चष्म्याच्या फ्रेमचा उल्लेख Cateye Frame कॅटआय फ्रेम करतो, हा तोच चष्मा. 

हेही वाचा :  Court Marriage करायचं ठरवताय? जाणून यासाठीची प्रक्रिया, शुल्क आणि आवश्यक कागदपत्र

अल्टीना यांना बालपासूनच चित्रकलेची आवड होती. त्यांच्या आयुष्याला खरं वळण तेव्हा मिळालं ज्यावेळी फिफ्थ एवेन्यू येथील अनेक दुकानांसाठी त्यांनी विंडो ड्रेसर म्हून काम केलं. विंडो डिस्प्ले डिजायनर म्हणून काम पाहतांनाच त्यांना कॅटआय फ्रेमची कल्पना सुचली. 

महिलांसाठी चष्म्याच्या फ्रेमचे फार पर्याय उपलब्ध नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. इथूनच त्यांनी या कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली. चष्म्याची ही फ्रेम तयार करण्यासाठी त्यांनी इटलीतील व्हेनिसमधील कार्निवलदरम्यान वापरल्या जाणाऱ्या हार्लेक्विन मास्कपासून प्रेरणा घेतली. बरंच संशोधन आणि अभ्यासानांतर एका दुरानदारानं त्यांच्या या फ्रेमला संधी दिली आणि पाहता पाहता हे डिझाईन संपूर्ण जगात लोकप्रिय झालं. 1930 पासून ही फ्रेम प्रकाशझोतात आली आणि तेव्हापासून आतापर्यंत हीच फ्रेम स्टाईल स्टेटमेंटही ठरली. असंख्य महिलांनी चष्मा आणि सनग्लासेससाठी या फ्रेमला पसंती दिली. त्याची नवनवीन रुपंही सर्वांसमोर आली. या साऱ्याची सुरुवात करण्याचं श्रेय सर्वतोपरी अल्टीना शिनासी यांचच. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Interesting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?

Interesting Facts : विमान प्रवास हा पहिलावहिला असो किंवा मग अगदी सराईताप्रमाणं नेहमीच्या नेहमी केला …

देशभर चर्चेत असलेल्या पोर्श कारची किंमत किती? स्पीड, मायलेज सर्वच जाणून घ्या…

Pune Accident News:  पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोर्श …