चेहरा धुतल्यानंतर टॉवेलनं पुसता? असं का करायला नको जाणून घ्या…

Skin Care Tips : आपला चेहरा हा ग्लोइंग आणि पिंपल नसलेला हवा असेल तर त्यासाठी आपण खूप काळजी घेतो. त्यासाठी बरेच लोक अनेक महागडे प्रोडक्ट्स वापरतात. त्यात वेगवेगळे मास्क आणि फेस पॅक वापरतात आणि अनेक घरगुती उपाय करतात. पण इतकं करूनही अनेकदा आपल्याला समस्या दूर होत नाहीत. फक्त चांगले प्रोडक्ट्स नाही तर त्यासाठी आपल्या चेहऱ्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. 

सगळ्यात नॉर्मल गोष्ट जी सगळेच करतात ती म्हणजे चेहरा धुतल्यानंतर चेहरा टॉवेलने पुसणे. अनेक लोक त्यांचा चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने पुसतात. काही लोक यासाठी खराब टॉवेल वापरतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, टॉवेल हा त्वचेच्या अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. 

बॅक्टेरिया पसरतात
एस्थेटिक थेरपिस्ट फातिमा गुंडुज यांच्या मते, चेहरा पुसण्यासाठी टॉवेल वापरल्यास त्वचेवर वाईट परिणाम होतो. कारण टॉवेलमध्ये ई.कोली (एस्चेरिचिया कोलाई) सारखे हानिकारक जीवाणू असू शकतात. जेव्हा तुम्ही टॉवेलनं तुमचा चेहरा पुसता तेव्हा हे जीवाणू तुमच्या त्वचेत प्रवेश करू शकतात, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

मुरुम आणि ब्रेकआउट्स वाढवते
जर तुम्हाला मुरुम किंवा ब्रेकआउट होण्याची शक्यता असेल तर, टॉवेलने तुमचा ओला चेहरा पुसल्याने समस्या वाढू शकते. चेहरा पुसताना टॉपेल घासला तर मुरुम वाढ शकतात. 

हेही वाचा :  अचानक का गळू लागतात पुरुषांचे केस? जाणून घ्या यावरील उपचार

योग्य स्किनकेअरसाठी 
चेहरा पुसण्यासाठी मऊ टॉवेल वापरा आणि तो चेहऱ्यावर घासण्या ऐवजी टॅप करा. बॅक्टेरियाचा प्रसार कमी करण्यासाठी टॉवेल स्वच्छ आणि केवळ तुमच्या चेहऱ्यासाठीत वापरा.

हेही वाचा : शाहरुख खाननं 1996 साली आमिरसाठी घेतलेला लॅपटॉप अभिनेत्यानं कधी वापरलाच नाही; कारण सांगत म्हणाला…

फेशियल टिश्यू किंवा स्वच्छ पेपर टॉवेल वापरा
तुम्ही डिस्पोजेबल पर्यायाला प्राधान्य देऊ शकता, चेहरा पुसण्यासाठी टिश्यू वापरू शकतात. जास्त दाब न लावता तुमचा ओला चेहरा हलक्या हातानं पुसण्यासाठी वापर करा.

मायक्रोफायबर टॉवेल
टॉवेल वापरण्याची कल्पना सोडणे तुम्हाला कठीण वाटत असल्यास, विशेषतः चेहऱ्याच्या वापरासाठी डिझाइन केलेल्या मायक्रोफायबर टॉवेल वापरण्याचा    विचार करा. मायक्रोफायबर टॉवेल्स त्यांच्या मऊपणासाठी आणि घर्षण न करता आर्द्रता शोषण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. ते सामान्यतः नेहमीच्या टॉवेलपेक्षा अधिक स्वच्छ असतात आणि ते धुऊन पुन्हा वापरता येतात.

तुमचा चेहरा पुसण्यासाठी टॉवेल वापरणे हा एक सोयीचा पर्याय वाटू शकतो, परंतु यामुळे तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. डेड स्किन आणि त्यासोबतच पिंपल्स अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)  

हेही वाचा :  अजित पवार भाजपात सामील झाल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार? पक्षाच्या प्रवक्त्यांचं मोठं विधान



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Mahavitaran Job: बारावी उत्तीर्ण आहात? महावितरणच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: बारावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र …

पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातली

Pune Crime News: विद्येचे माहेरघर असलेले पुणे सध्या वेगळ्याच कारणांमुळं चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून …