बकऱ्यासाठी मेंढपाळाने तब्बल 1 कोटी रुपये नाकारले; कारण विचारलं तर म्हणतो “त्याच्या शरिरावर…”

Viral News: ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी लाखोंमध्ये बकऱ्यांची विक्री होत असताना राजस्थानमधील एका मेंढपाळ मात्र वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. चुरु जिल्ह्यतील या मेंढपालाने आपल्या कोकरुसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची ऑफर नाकारली. Eid Al-Adha च्या निमित्ताने त्याच्याकडील कोकरु विकत घेण्यासाठी ग्राहकाने 1 कोटी रुपये देऊ केले होते. राजू सिंह असं या मेंढपाळाचं नाव असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

पण कोकरुसाठी इतकी किंमत का?

राजू सिंह यांच्याकडील या कोकरुच्या अंगावर ‘786’ क्रमांक लिहिलेला आहे. मुस्लिमांमध्ये हा फार लकी नंबर मानला जातो. राजू सिंह याने आपल्याला त्याच्या शरिरावर कोणता क्रमांक हे  अर्थ सुरुवातीला समजत नव्हतं असं सांगितलं. पण नंतर त्यांनी मुस्लीम समाजातील काहींशी संपर्क साधला असता हा क्रमांक 786 असल्याचं त्यांना कळलं. 

मुस्लिमांमध्ये त्यातही खासकरुन भारतीय उपखंडातील मुस्लीम 786 हा फार नशीबवान किंवा पवित्र क्रमांक मानतात. राजू सिंह याने सांगितलं आहे की, मुस्लीम समाजात या क्रमांकाला फार महत्त्वं असलं तरी आपण त्याला विकत नाही यामागे आपलं त्याच्यावर असणारं प्रेम आहे. 

“हे कोकरु गेल्या वर्षी जन्माला आलं आणि आता लोक त्याच्यावर बोली लावत आहेत,” असं मेंढपाळाने सांगितलं. लोक मला 70 लाख आणि त्यापेक्षाही जास्त पैसे देऊ करत आहेत. पण मी हे वासरु विकण्यास अजिबात तयार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. 

हेही वाचा :  भले शाब्बास! चांद्रयान-३ने पू्र्ण केली दोन उद्दिष्ट्ये; राहिले केवळ १, इस्रोने दिली महत्त्वाची अपडेट

दरम्यान, वासराला इतकी किंमत मिळू लागल्यानंतर त्याची आणखी प्रेमाने काळजी घेतली जात आहे. त्याला डाळिंब, पपई, बाजरी आणि हिरव्या भाज्या खाण्यासाठी दिल्या जात आहेत. तसंच सुरक्षेच्या कारणास्तव आता वासराला घऱाच्या आतच ठेवलं जात आहे. 

ईदच्या आधी कुर्बानीच्या जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात बोली लावणे आता सामान्य झालं आहे. 2022 मध्ये छत्तीसगडच्या रायपूरमध्ये एका विशेष बकरीची किंमत 70 लाख रुपये होती. मोठ्या किंमतीचे कारण म्हणजे ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’ सारखे शब्द बकरीच्या शरीरावर कोरलेले असल्याचा दावा मालकाने केला होता. वाहिद नावाच्या मालकाने दावा केला की त्याला नागपूरहून 22 लाख रुपयांची ऑफर मिळाली.

2019 मध्ये गोरखपूरमध्ये एक बकरा 8 लाखांना विकला गेला होता. त्याच्या शरीरावर ‘अल्लाह’ हा शब्द नैसर्गिकरित्या लिहिला गेल्याचा दावा मालकाने केला होता. “या बकऱ्याचे वजन 90 किलोपेक्षा जास्त आहे, आम्ही त्याचे नाव सलमान ठेवले आहे. बकरीवर नैसर्गिकरित्या ‘अल्ला’ आणि ‘मोहम्मद’ असे लिहिलेले आहे. त्याची किंमत 8 लाख रुपये आहे,” असं बकऱ्याचे मालक मोहम्मद निजामुद्दीन यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं होतं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …