Anant Radhika : गुपचूप उरकला मुकेश अंबानींच्या धाकट्या लेकाचा Ananat Ambaniचा साखरपुडा; पहिलेवहिले PHOTO समोर

Anant Ambani Radhika Merchant Engagement: अंबानी (Ambani) कुटुंबात सध्या आनंदाच वातावरण आहे . रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा  धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा रोका सोहळा पार पडला, लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत, अनंत अंबानी यांनी गर्लफ्रेंड राधिका मर्चंड हिच्यासोबत लग्न करण्याचा घेतला ज्याला घरच्यांनीसुद्धा परवानगी दिली . दोघांनी राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिरात घरच्यांच्या उपस्थित साखरपुडा उरकला आहे त्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत आणि लवकरच अंबानी कुटुंबात लग्नाची शेहनाई वाजणार हे नक्की  (ananat ambani radhika marchant engegement)

एंकोर हेल्थकेअरचे (anchor healthcare) सीईओ विरेन मर्चंट यांची राधिका ही मुलगी आहे.  (who is radhika merchant) राधिका पाठक डान्सर आहे अनंत आणि राधिका गेले अनेक वर्ष एकमेकांचे चांगले मित्र आहेत. राधिकाचं शालेय शिक्षण

मुंबईतील कॅथड्रियल अँड जॉन कॉनन स्कूल आणि इकोल मोन्डियल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केले आहे. पुढे तिनं न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2017 मध्ये तिनं इसप्रावा टीममध्ये sales Executive

म्हणून नोकरी सांभाळली. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात सक्रिय असण्यासोबतच राधिका एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा अरंगेत्रम (Radhika merchant arangetram ceremony) सोहळा पार पडला होता. यावेळी

हेही वाचा :  झकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?

अंबानी कुटुंबासमवेत काही सन्माननीय व्यक्तींचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. आपल्या सुनेचे कलागुण पाहिल्यानंतर व्यासपीठावर खुद्द नीता अंबानी (Nita Ambani) यांनी तिचं तोंड भरून कौतुक केलं होतं. लवकरच राधिका अंबानी कुटुंबाची

सुनबाई होणार आहे.  त्यांच्या साखरपुढ्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहे फोटो सोशल मीडियावर अपलोड होताच सगळीकडून अंबानी कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (ananat ambani radhika marchant engegement)

यामध्ये दोघेही आनंदात दिसत असून सर्व मित्रपरिवार या सोहळ्यात सहभागी झाला आहे.अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची  रोका समारंभ म्हणजेच साखरपुडा आज पार पडला. राजस्थानमधील (rajsthan) नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात अंबानी आणि मर्चट कुटुंबिय तसेच मित्र मैत्रीणींच्या उपस्थित हा समारंभ पार पडला. अनंत आणि राधिका यांच्यावर सर्वांकडून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …