Alia Bhatt and Ranbir Kapoor: अखेर मुहूर्त ठरला! आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच घेणार सात फेरे

Alia Bhatt and Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. आलिया आणि रणबीर या दोघांचेही लग्न लवकर व्हावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने चाहत्यांची निराशा होत आहे. आलियाने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिच्या मनात रणबीरसोबत लग्न झाले आहे, तेव्हा चाहत्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला होता. अशा परिस्थितीत दोघेही प्रत्यक्षात जेव्हा सात फेरे घेतील, तेव्हा काय होईल याची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्र चित्रपटानंतर रणबीर आणि आलिया लगेचच लग्नगाठ बांधू घेऊ शकतात असं बोललं जात आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यापूर्वी, रिपोर्ट्समध्ये असे समोर आले होते की, बॉलीवूडचे हे क्यूट कपल डिसेंबर 2022 मध्ये रेशीमगाठ बांधतील. तर, ई-टाइम्सच्या नवीन अहवालानुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट डिसेंबर नव्हे तर ऑक्टोबर 2022 मध्ये लग्न करू शकतात. मात्र, रणबीर कपूर आणि अलीकडे भट्ट यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा :  Mithila Palkar : 'वेब सीरिज क्वीन' मिथिला पालकर!

रणबीर कपूरने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, जर कोरोना नसता तर एप्रिल 2021 मध्येच त्याचं आणि आलियाचं लग्न झालं असतं. अलीकडेच जेव्हा आलियाला रणबीरसोबत लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, ‘माझ्या मनातच मी रणबीरशी लग्न केलं आहे, माझं रणबीरशी खूप आधीच लग्न झालं आहे.’

आलिया भट्टच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या यशानंतर ही आलियाचा आनंदाला पारावार उरला नसून भट्ट कुटुंबासोबतच रणबीर कपूरही तिच्या आनंदात सामील आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …