लग्नानंतर वधूने संबंध ठेवण्यास दिला नकार, जबरदस्तीने स्पर्श केल्यानंतर नवऱ्याला बसला धक्का

Cheating on the Groom by the Bride : एका लग्नाची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लग्नानंतर नववधूने अनेक दिवस संबंध ठेवण्यास नकार देताना नवऱ्याला जवळही येण्यास दिले नाही. ज्यावेळी नवऱ्याने जबरदस्तीने स्पर्श केला. त्यावेळी ती भडाभडा बोलत राहिली. ज्यावेळी तिने काही सांगितले,  त्यावेळी नवऱ्याच्या पाया खालची वाळूच सरकली. नवऱ्याला कळले की, ती आधीच विवाहित आहे. तिने नवऱ्यालाच धमकी दिली. जबरदस्ती केलीस तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची नववधुने धमकी दिली. त्यामुळे पतीला आता काय करायचे याचा मोठा धक्का बसला.

राजस्थानमधील जयपूरमधीळ ही धक्कादायक घटना समोर आली आहे. नववधूने अनेक दिवस आपल्या पतीशी गोडबोलून शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र, आपली पत्नी सातत्याने असं का वागते, याचा विचार करत तो राहिला. एके दिवशी त्याने तिला जबरदस्तीने स्पर्श केल्यावर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तिने दिली. तसेच माझे आधीच लग्न झाल्याचेही तिने सांगितले. आता पतीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा :  कच्चा तेलाच्या किमतीत वाढ, अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे!

4 लाख रुपये खर्चून त्याने केले लग्न 

जयपूरच्या मुहाना पोलीस हद्दीत राहणाऱ्या वऱ्हाडीमंडळींसोबत नवरीने एवढी मोठी फसवणूक केली आहे की आता पती पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. सुमारे 4 लाख रुपये खर्चून त्याने लग्न केले. ही रक्कम वधूच्या कुटुंबीयांना देण्यात आली. वधूही घरी आली पण तिला हनिमून करण्यास सातत्याने तिने नकार दिला. आपले व्रत आहे.  तसेच आपल्याला नवस फेडायचा आहे. असे सांगून पतीला दूर ठेवत गेली. पण जेव्हा वराने जबरदस्तीने स्पर्श केला. त्यावेळी तेव्हा ही जबरदस्ती त्याच्यावर भारी पडली. आता नववधूने त्याला अनेक प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आहे. माझ्याकडून तू पैसे घेतले असून आता आणखी पैसे मागत आहेत. तसेच बलात्काराच्या गुन्हातही अडकवण्याची तिने धमकी दिली.

मित्राला लग्नाबाबत सांगितले आणि…

आता वराला कळून चुकले आहे की, ती आधीच विवाहित आहे. म्हणून त्याने आता पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मुहाना पोलिसांनी सांगितले की, खासगी कंपनीत काम करणारे छोटे लाल यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, राजू नावाचा तरुण मुहाना परिसरात त्यांच्या कारखान्याबाहेर चहाची गाडी लावायचा. काही दिवसांपूर्वी छोटे लालने राजू यांच्याशी लग्नाचा विषय काढला. लग्न होत नसल्याचे बोलून दाखवले. अनेक स्थळे येतात पण काही लग्न जमत नाही. अशा स्थितीत माझं वयही पस्तीस वर्षे होत आले आहे.

हेही वाचा :  केसरीया बालम! Indian Railway देतंय राजस्थान फिरण्याची सुवर्णसंधी, पाहा Package Details

मित्र मुलीच्या घरी घेऊन गेला आणि तिच्याशी भेट झाली…

राजूने सांगितले की, त्याच्या एका मित्राची बहीण कुमारी आहे. दीपक असे त्या मित्राचे नाव आहे. त्यानंतर राजू छोटूलालला घेऊन दीपकच्या घरी गेला. तिथे त्याची बहीणीशी भेट झाली. लग्नासाठी सुमारे चार लाख रुपये कुटुंबाला देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी लग्नही झाले. लग्नानंतर बरेच दिवस नववधुने छोटे लाल याला जवळ येऊ दिले नाही. तिची काही दिवसांची इच्छा आहे, ती पूर्ण झाली की संबंध ठेवता येईल, असं ती सांगत होती. पण जेव्हा बरेच दिवस उलटून गेले, तेव्हा छोटे लालने जबरदस्तीन स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नववधुने सांगितले की, मी आधीच विवाहित आहे. या प्रकरणावरुन मोठा गोंधळ उडाला. आता छोटे लाल याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर वधुविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याची पत्नी त्याला उलट बलात्कार, हुंडा प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ​​आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का

Big News For Bank Customer: भारतातील एटीएम ऑपरेटर्सची संस्था असलेल्या कॉन्फीडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (Confederation …

अण्वस्त्रसज्ज चीननं वाढवली जगाची चिंता; पाकिस्तानही दहशतीच्या छायेखाली, भारतात काय चित्र?

SIPRI report : भारतीय सीमाभागात एकिकडे पाकव्याप्त (POK) काश्मीरमधून (Kashmir) सातत्यानं देशात घुसखोरीचा प्रयत्न केला …