गळ्याला दुपट्टा गुंडाळून 16 वर्षांची मुलगी करत होती स्टंट, तितक्यात पकड घट्ट झाली अन्…

Viral News: सोशल मीडिया म्हटलं की त्याचे फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू असतात. आता त्यातील कोणती बाजू निवडायची हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. याच निवडीवर अनेकदा आपलं भवितव्यही अवलंबून असतं. कारण चुकीची बाजू निवडली तर त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यातलाच एक भाग म्हणजे सोशल मीडियावर मनोरंजनाच्या नावाखाली धोकादायक स्टंट खेळणं. असाच एक स्टंट खेळताना एका 16 वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. 

TikTok वर एक ‘स्कार्फ गेम’ नावाचा स्टंट खेळला जात आहे. हा गेम खेळताना एका 16 वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ‘Blackout Challenge’ चं व्हेरिएशन असणाऱ्या या खेळात गतवर्षी अनेकांनी जीव गमावला आहे. 

Christy Sibali Dominique Gloire Gassaille असं या मुलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी तिने आपल्या घऱात हा जीवघेणा स्टंट करत आपला जीव गमावला. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ‘स्कार्फ गेम’ मध्ये मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह रोखण्यासाठी गळ्यात कपडा बांधला जातो. पूर्ण बेशुद्ध होईपर्यंत हा कपडा गळ्याभोवती गुंडाळलेला असतो. काही लाइक्स मिळवण्याच्या नादात खेळल्या जाणाऱ्या या खेळात 16 वर्षांच्या मुलीला आपला जीव गमावावा लागला आहे. 

हेही वाचा :  Lower Cholesterol Diet : वयाच्या 30 शीतच खायला सुरू करा ‘हे’ 5 पदार्थ, म्हातारपणापर्यंत शरीरात घुसणार नाही हार्ट अटॅकला जबाबदार कोलेस्ट्रॉल..!

7 जून रोजी या मुलीवर फ्रान्समधील ऑर्लिन्स येथील राहत्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्त्वाची बाब म्हणजे, चिनी मालकीच्या TikTok मध्ये ‘स्कार्फ गेम’ सारखे अनेक धोकादायक गेम आहेत, जे मेंदूला होणार ऑक्सिजनचा पुरवठा रोखतात. तसंच गंभीर दुखापत, मृत्यूचा धोका निर्माण करतात. TikTok वर व्हायरल चॅलेंज ‘ब्लॅकआउट चॅलेंज’ मध्येही अशाच प्रकारचा धोका होता. 

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, TikTok वर ‘scarf game’ सर्च केलं असता आता कोणतेही परिणाम दिसत नाही. व्हिडिओ-शेअरिंग अॅपने आता युजर्सना याउलट योग्य काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सुरक्षित आणि सकारात्मक गोष्टींचा प्रसार करणं आमचं प्राधान्य आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …