नेहमी उदास असायचा माणूस, घरात लावले जगातील सर्वात धोकादायक वनस्पतीचे रोप आणि…

Viral News:  काही लोकांमध्ये भीतीवर विजय मिळवण्याची ताकद आणि धैर्याची पातळी वेगळी असते. डॅनियल एमलिन-जोन्स ही अशीच एक व्यक्ती. तो ऑक्सफर्डमध्ये जगातील सर्वात धोकादायक वनस्पती वाढवत आहे. (world most dangerous leaves plant ) शास्त्रज्ञांना डेंड्रोकॅनाइड्स मोरॉइड्स म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती स्टिंगिंग नेटटलची साम्य असणारी आहे. दुःखावर मात करण्यासाठी मानवाकडे अनेक मार्ग आहेत. जरी या पद्धती सोप्या आणि विचित्र असू शकतात. परंतु जर आपण जगातील सर्वात धोकादायक वनस्पती वाढवली तर दुःख  अधिक धोकादायक बनते, हे खरे आहेस असे सांगितले गेलेय.

ब्रिटनच्या डॅनियल एमलिन-जोन्स (49) यांनी जगातील सर्वात धोकादायक वनस्पती वाढवली आहे, ज्याचा डंक इतका वाईट आहे की, त्यामुळे अनेक महिने वेदना होतात आणि आत्महत्येचे विचारही येतात. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, डॅनियलने आपल्या घरात जिम्पी-जिम्पी नावाची वनस्पती उगवली आहे, जी त्याने पिंजऱ्यात ठेवली आहे आणि त्यावर ‘डेंजर’ असे लिहिले आहे.

ही वनस्पती का आहे धोकादायक?

ही वनस्पती विंचवासारखी असल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या पानांना स्पर्श केल्यास तीव्र आणि असह्य वेदना होतात. डंक मारल्यासारखे वाटते. जर कोणी त्याच्या पानांना हात लावला तर वेदना सहन होत नाही आणि लोकांना स्वतःचा जीव घेण्याची कल्पना येते. एकदा शेतकऱ्याने स्वतःवर गोळी झाडून स्वतःचा जीव घेतला, असेही सांगितले जाते. 

हेही वाचा :  Diabetes Remedy : घरातील झाडांची ही पानं तोडून रोज उपाशी पोटी पाण्यात घालून प्या, कधीच वाढणार नाही Blood Sugar

जगातील सर्वात विषारी वनस्पती 

जिम्पी-जिम्पी, ज्याला ‘ऑस्ट्रेलियन स्टिंगिंग ट्री’ म्हणूनही ओळखले जाते. (Australian Stinging Tree) ती जगातील सर्वात विषारी वनस्पती म्हणून ओळखली जाते. या वनस्पतीपासून गरम आम्ल जळणे आणि विजेचा धक्का बसणे हे एकाच वेळी जाणवते. डॅनियल हे ऑक्सफर्डचा ऑनलाइन ट्यूटर आहे. त्यांनी मेट्रो या ब्रिटीश वृत्तपत्राला सांगितले की, मला वाटले की यामुळे माझ्या बागकामात काही नाट्य येईल. मी सर्वात धोकादायक वनस्पती वाढवण्याचा निर्णय घेतला. कारण मला geraniums सह कंटाळा आला होता. ते म्हणाले, ‘तुम्ही इंटरनेटवरून बियाणे खरेदी करू शकता. पण ते एका विशिष्ट क्षेत्राच्या पलीकडे ही वनस्पती पसरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. म्हणून मी ते माझ्या समोरच्या खोलीत ठेवतो. मला माझे बियाणे ऑस्ट्रेलियातील एका कंपनीकडून मिळाले. त्याची किंमत 60 ऑस्ट्रेलियन डॉलर्स आहे. 

सर्वात वाईट प्रकारची वेदना

ज्यांनी वनस्पतीपासून वेदना अनुभवल्या आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ही वनस्पती तिच्या आश्चर्यकारकपणे वेदनादायक डंखासाठी कुप्रसिद्ध आहे. याचा डंक झाल्यानंतर काही आठवडे किंवा महिने पीडित व्यक्तीला वेदना होतात. आपण सर्वात वाईट प्रकारची वेदनेची कल्पना करु शकता. जर त्वचेतून डंकणारे केस काढले नाहीत तर ही वनस्पती पीडितांना एक वर्षापेक्षा जास्त काळ वेदना देऊ शकते. असे सांगितले जाते की, एकदा एका व्यक्तीने त्याचा टॉयलेट पेपर म्हणून वापर केला आणि वेदनामुळे तो वेडा झाला. नंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 

हेही वाचा :  'देवच माझी रक्षा करेल,' म्हणत पादरीने सिंहांच्या पिंजऱ्यात मारली उडी; खेचला सिंहाचा कान अन् पुढच्या क्षणी...Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …