वडिलांसमोरच शार्कने तरुण मुलाला जिवंत गिळले; अंगावर काटा आणणारा Video Viral

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) सध्या अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शार्कने (Shark Attack) एका तरुणावर हल्ला करुन त्याला संपवल्याचे दिसत आहे. टायगर शार्कने (Tiger shark) इजिप्तच्या हर्गहाडा (Hurghada) शहराच्या मध्यभागी एका रशियन पर्यटकावर हल्ला केला. या भयानक हल्ल्यामध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा सर्व थरार एका व्यक्तीच्या कॅमेरात कैद झाला आहे. समुद्रकिनाऱ्यावर पोहणाऱ्या एका रशियन पर्यटकाला शार्कने जिवंत गिळलं आहे. 

या हल्ल्यात आणखी दोन पर्यटक जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेदरम्यान त्या तरुणाच्या वडिलांसह अनेक लोक समुद्रकिनाऱ्यावर होते. इजिप्तच्या पर्यावरण मंत्रालयाने या भयानक घटनेनंतर 74 किमीचा समुद्र किनारा बंद करण्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तरुण त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत समुद्रात गेला होता. त्यानंतर शार्कने त्याला खोल पाण्यात ओढले. घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितले की, शार्क जेव्हा तरुणाला पाण्यात ओढत होता तेव्हा तो ‘पप्पा, पप्पा…’ असे ओरडत होता. हल्ल्यानंतर तरुण मदतीची याचना करत होता. मात्र कोणीही मदतीसाठी पुढे येऊ शकले नाही.

या हल्ल्यानंतर सरकारने अल-गौना रिसॉर्ट आणि सोमा बे दरम्यान पोहणे, स्नॉर्कलिंग आणि इतर खेळांवरही पुढील 2 दिवस बंदी घातली आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर शार्कला पकडून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, शार्क सहसा समुद्राच्या किनारी भागात हल्ला करत नाहीत.

हेही वाचा :  कारसेवक ते बालरोगतज्ज्ञ... भाजपने राज्यसभेसाठी रिंगणात उतरवलेले डॉ. अजित गोपछडे कोण आहेत?

तरुणावर हल्ला झाल्यानंतर समुद्रकिनारी उभे असलेले लोक हा संपूर्ण प्रकार पाहत होते. स्वत: तरुणाचे वडील आपल्या मुलाच्या मृत्यूचे दृश्य असहाय्यपणे पाहत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हा तरुण पाण्यात हातपाय मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शार्क देखील दिसत आहे. आधी शार्क त्याच्या भोवती फिरताना दिसते. नंतर त्याला पाण्याखाली खेचून संपवून टाकते. 

दरम्यान, शार्कच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रशियन पर्यटकाचे नाव व्लादिमीर पोपोव्ह असल्याचे समोर येत आहे. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, “आम्ही पोपोव्हची मदत करण्याचा प्रयत्न केला होता. पण हे सगळं काही क्षणात घडले. पाण्यात हालचाल होताच मला  शार्क असल्याचा संशय आला होता. इतर लोकांना शार्कबद्दल सावध करण्यासाठी मी ताबडतोब किनाऱ्यावर आलो. बचावकर्त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत शार्कने हल्ला केला होता.”



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …