​Travel Booking ऑनलाई करता का? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या नाहीतर व्हाल स्कॅमचे शिकार

Safe online booking tips : अनेकांना फिरण्याची भटंकती करण्याची आवड असते. कुठे नाही तरी अनेकजण आपल्या गावी जातच असतात. अशामध्ये आजका अनेकजण कुठेही जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणं पसंद करतात. आता तुम्हीही प्रवासासाठी ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर आजची बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. कारण अँटिव्हायरस कंपनी मॅकॅफीच्या एका नवीन अहवालानुसार, भारतात ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग घोटाळ्याची प्रकरणे तेजीने वाढत आहेत. या घोटाळ्यामुळे सुमारे ५१ टक्के लोकांचे पैसे आजवर बुडाले आहेत आणि लोक अजूनही या सर्वाला बळी पडत आहेत. या अहवालात भारतातील १००० सह एकूण ७ देशांतील ७००० जणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यावरून भारतीय प्रवासी या घोटाळ्याला अधिक बळी पडत असल्याचे दिसून येते. तर या घोटाळ्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ…

बनावट ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे तुमची आयडेंटीही होते चोरी

बनावट ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे तुमची आयडेंटीही होते चोरी

३६% पीडितांनी सांगितले आहे की, ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेदरम्यान त्यांची आयडेंटी चोरीला गेली आहे. जेव्हा ते बनावट वेबसाइटवर लॉग इन करतात तेव्हा त्यांना अनेक तपशील विचारले जातात. तसेच लिंक्स दिल्या आहेत ज्यावर क्लिक करावे लागते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सुमारे १३ टक्के लोकांनी त्यांच्या पासपोर्टचे तपशीलही बनावट वेबसाइटवर शेअर केले आहेत. जे चोरीला झाल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा :  WhatsApp Call करणाऱ्या युजर्ससाठी कामाची बातमी, या फीचरमुळे मिळणार मोठा फायदा

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

VPN चा वापर न करणं

vpn-

रिपोर्ट्सनुसार ३३ टक्के लोकांनी हे मान्य केले की ते अनेकदा व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क अर्थात VPN वापरत नाहीत. VPN न वापरल्यास इंटरनेट इंटरसेप्शन आणि डेटा चोरीच्या घटना वाढतात. McAfee ने म्हटले आहे की VPN वापरणे प्रवाशांना बँकिंग, खरेदी आणि ऑनलाइन ब्राउझिंग करताना त्यांचे कनेक्शन सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

​​वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

​सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट धोक्याचे

​सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट धोक्याचे

अनेक वेळा आपण सार्वजनिक वाय-फायशी कनेक्ट करूनच प्रवासाचे नियोजन करू लागतो. पण हे खूप धोकादायक असू शकते. कोणतीही खबरदारी न घेता मोफत इंटरनेट वापरल्याने तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. ३८ टक्के लोकांनी हे मान्य केले आहे की ते विमानतळ, कॅफे इत्यादींमध्ये सार्वजनिक वाय-फाय वापरतात. पण यामुळेच तुमचा फोन हॅक होऊ शकतो.​

वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

हेही वाचा :  Mumbai Viral Video : धावत्या बाईकवर दोघींसोबत तरुणाचा खतरनाक स्टंट, व्हिडीओ पाहून मुंबई पोलिसांनीही बसला धक्का

​बनावट प्लॅटफॉर्मद्वारे पेमेंट

​बनावट प्लॅटफॉर्मद्वारे पेमेंट

अहवालानुसार, २७ टक्के भारतीय लोकांनी हे कबूल केले आहे की त्यांनी बनावट प्लॅटफॉर्मद्वारे पैसे दिले ज्यामुळे त्यांचे पैसे हॅकर्सना सोप्या पद्धतीने अगदी सहज चोरता आले. ऑफिशिअल वेबसाईट नाही तर हॅकर्सनीच तयार केलेल्या फेक वेबसाईट्सवरुन हॅकर्स ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी सांगतात. ज्यानंतर वापरकर्ते पेमेंट करतात आणि पैसे थेट हॅकर्सकडे जातात, अनेकदा अकाउंटमधील इतरही पैसे लंपास होण्याची भिती असते.

​वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

हॉटेलमध्ये खातं लॉगिन सोडणं

हॉटेलमध्ये खातं लॉगिन सोडणं

अनेक वेळा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा तिथे हॉटेल घेतो. तेथे बरेच वेळा लोक त्यांचे अकाउट लॉगिन करुन सोडून देतात. सर्वेक्षणात, सुमारे २९ टक्के लोकांनी हॉटेलमध्ये त्यांचे खाते लॉगिन सोडल्याचे मान्य केले आहे. असे केल्याने तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.
तुम्हाला थेट गंडा घातला जाऊ शकतो.

​वाचाः Window AC ला बाहेरच्या बाजुने का लावतात, कधी विचार केलाय?, जाणून घ्या नेमकं कारण

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …