सौंदर्याची खाण पाहिली रूपाली भोसलेचे नऊवारीतील रूप, काळजाची होतेया काहिली

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना अर्थात रूपाली भोसले नेहमीच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. रूपालीच्या चाहत्यांच्या यादीमध्ये वाढच होताना दिसून येतेय. आता रूपालीने गुढीपाडव्याला नेसलेल्या नऊवारी साडीतील फोटो पोस्ट केले असून चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकवला आहे.

नऊवारी साडीत रूपालीचे सौंदर्य खुलून आले असून वाईन रंगाची ही नऊवारी आणि त्यासह रूपालीने केलेली स्टाईल अत्यंत आकर्षक आणि सुंदर दिसते. कसा आहे हा लुक काय आहे याचे डिटेलिंग जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – @rupalibhosle Instagram)

नऊवारी पैठणीतील सौंदर्य

नऊवारी पैठणीतील सौंदर्य

रूपाली भोसलेच्या नऊवारीवरून नजरच हटत नाहीये. नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा रंग असून ही पैठणी संपूर्ण हँडक्राफ्टने भरलेली दिसून येत आहे. वाईन आणि वांगी रंगाच्या मिक्स रंगातील ही पैठणी खूपच सुंदर आणि उठावदार आहे. रूपालीने यासह पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घालून लुकला अधिक शोभा आणली आहे.

गोल्डन मोत्यांचे दागिने

गोल्डन मोत्यांचे दागिने

यासह मोत्यांचे आणि गोल्डन असे दागिने रूपालीने परिधान केले आहे. यामध्ये संपूर्ण भरलेला कान असणारे मोठे कानातले तर गळ्यात मोत्यांची चिंचपेटी आणि हार परिधान केला आहे. यासह तिने कमरपट्टा घातला असून मोत्याच्या नथीने हा नऊवारी साडीतील लुक पूर्ण केला आहे. जणू काही सौंदर्याची खाणच दिसत आहे.

हेही वाचा :  राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासमोर जेव्हा आजोबांच्या वयाची व्यक्ती येते....

(वाचा – भाऊ कदमची मुलगी मृण्मयीच्या अदा अभिनेत्रींवरही करतायत मात, स्टाईल पाहून तुम्हीही व्हाल फिदा)

मोत्यांच्या बांगड्या आणि अंगठी

मोत्यांच्या बांगड्या आणि अंगठी

दागिन्यांमध्ये रूपालीने अधिक आकर्षकता आणण्यासाठी मॅचिंग बांगड्या आणि त्यासह मोत्यांच्या बांगड्यांचे एकत्रीकरण केले आहे. याशिवाय तिने बोटांमध्ये मोत्यांच्या अंगठ्या घातल्या असून अत्यंत सुंदर आणि रॉयल दिसत आहे. कपाळावर चंद्रकोर लावत तिने हा लुक पूर्ण केला आहे.

(वाचा – मलायकाने ब्लॅक बॅकलेस गाऊनमध्ये तापवलं इंटरनेटचं वातावरण, ४८ व्या वर्षीही तरूणीना लाजवेल असा ग्लो )

वेव्ही हेअरस्टाईल अंबाडा

वेव्ही हेअरस्टाईल अंबाडा

दरम्यान यासह रूपालीने वेव्ही हेअरस्टाईल पुढून केली असून आंबाडा घातला आहे आणि त्यात फुलं माळून लुकला अधिक आकर्षकता आणली आहे. अत्यंत सुंदर आणि पारंपरिक असा हा लुक दिसून येत असून कोणत्याही सणासाठी अथवा लग्नासाठी तुम्ही या लुकवरून प्रेरणा घेऊ शकता.

‘कल्याणची चुलबुली’ शिवालीचा बेधडक मॉडर्न पैठणी ड्रेस लुक, पारंपरिकतेसह आधुनिकतेचा मेळ)

क्लासी मेकअप

क्लासी मेकअप

नऊवारी साडीसह तिने साडीला मॅच होणारा असा मेकअप केला आहे. स्मोकी आईज, आयलॅशेस, हायलायटर, काजळ, आयलायनर, डार्क आयब्रो आणि वाईन लिपस्टिक असा मेकअप करत तिने नऊवारी साडीसह मॅचिंग असा परफेक्ट मेकअप निवडला आहे.
रूपालीचीही ही स्टाईल आणि अदा चाहत्यांच्या काळजात घर करत आहे. तुम्हीही तिच्या या लुकवरून प्रेरणा घेऊ शकता.

हेही वाचा :  Maharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासा

महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …