सातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा पगारवाढ, मूळ वेतनात ‘इतकी’ वाढ

7th Pay Commission DA Hike : वेतन आयोगाचा नुसता उल्लेख केला तरीही, अनेकांचेच कान टवकारतात. कारण, शेवटी मुद्दा पगाराचा, पैशांचा असतो. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतीव महत्त्वाच्या असणाऱ्या या वेतन आयोगांच्या बाबतीत अशीच एक महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा समोर आली असून, त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या खात्यात नेमकी किती रक्कम येणार आहे याबाबतची गणितं सोडवण्यास आता अनेकांनीच सुरुवात केली आहे. 

मार्च 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढणार असल्याची माहिती समोर आली, ज्यामध्ये त्यांचा DA वाढून 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांवर पोहोचला. ज्यानंतर आता म्हणे नवा भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे. नव्यानं लागू होणाऱ्या भत्त्याची घोषणा मात्र सप्टेंबरपर्यंत होऊ शकते. सरकारी कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांना पगारातील भत्ता वाढवून दिला जातो, ज्यामुळं त्यांच्या मूळ वेतनात सातत्यानं वाढ होत राहते. तर, फिटमेंट फॅक्टर Appraisals Cycle नुसार वाढतं. दरम्यान, आता असं म्हटलं जात आहे की, फिटमेंट फॅक्टरशिवायच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच मोठी वाढ होणार आहे. 

काय आहे भत्त्याचं गणित? 

2016 मध्ये केंद्र सरकारच्या वतीनं सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य टक्के होता. ज्यामुळं त्यांचा थकित भत्ता मूळ वेतनात जोडला गेला होता. आता पुन्हा एकदा अशीच काहीशी परिस्थिती उदभवणार आहे. ज्यामुळं कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन आता 18 हजार रुपयांवरून 27 हजार रुपयांवर पोहोचणार आहे. थोडक्यात महागाई भत्ता मूळ वेतनाच जोडला गेल्यामुळं ही पगारवाढ होणार आहे. (7th pay commission) 

हेही वाचा :  आता पुरुषही रोखू शकतात गर्भधारणा, ICMR ला मोठं यश; महिलांसाठी क्रांतिकारी बदल

सध्याच्या घडीला पे बँड लेवल 1 वर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 18 हजार रुपये आहे. यावर कर्मचाऱ्यांना 7500 रुपयांचा महागाई भत्ता मिळतो. पण, 50 टक्के महागाई भत्त्यामुळं आता ही रक्कम 9 हजारांवर पोहोचेल. म्हणजेच आता मूळ वेतन 18000 रुपयांवरून थेट 27 हजार रुपयांवर पोहोचणार आहे. यानंतर 27 हजार रुपयांच्या मूळ वेतनावर महागाई भत्ता मोजला जाईल. 

दरम्यान, सध्या कर्मचाऱ्यांना पगारात 42 टक्के महागाई भत्ता देण्यात येत असून, जुलै 2023 ला 4 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर हा आकडा 46 टक्क्यांवर पोहोचेल. यानंतर म्हणजेच 2024 मध्ये हा भत्ता 4 टक्क्यांन वाढून 50 टक्क्यांवर पोहोचेल. म्हणजेच जुलै 2024 ला कर्मचाऱ्यांना हा वाढीव पगाराचा फायदा मिळेल. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मिम्समधून जगभरात पोहोचलेल्या काबोसू श्वानाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी

Kabuso Dog Death: तुम्ही सोशल मीडियात सतत अॅक्टीव्ह असाल, मीम्स पाहायची तुम्हाला आवड असेल तर …

धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, ‘आजपासून मी तुम्हाला..’

Ravindra Dhangekar Pune Police Party Photos: पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा …