‘मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता’, अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलीसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, ‘घरापासून..’

Pune Porsche Accident:  पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करत त्याची रवानगी बालसुधार गृहात केली आहे. पुणे अपघात प्रकरणात पोलिस प्रशासनावरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहे. अल्पवयीन मुलाला पिझ्झा, बर्गर देण्यात आला होता का? तसंच, पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली आहेत. 

पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा खुलासा अमितेश कुमार यांनी केला आहे. अल्पवयीन मुलगा गाडी चालवत नव्हता तर चालक गाडी चालवत होता, अशा पद्धतीने केसची दिशा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा एक प्रकारचा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असून. त्यामुळं या प्रकरणी 201 अंतर्गंत कारवाई करण्यात येईल. सर्व दिशेने तपासदेखील करण्यात येत आहे. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हूणन तसे कलम वाढवण्यात येणार आहे, असं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा :  भिकारी बनून रेकी केली, संधी मिळताच लांबवलं तब्बल 200 तोळे सोनं; पुण्यात फिल्मी स्टाईल चोरीचा थरार

आरोपीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर सुरुवातीला ड्रायव्हरने पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं होतं की गाडी मी चालवत होतो. ते तो कोणाच्या दबावामुळं करत होता याची चौकशी सुरू आहे. या काळात घटनाक्रम बदलण्याची गोष्ट समोर आली आहे. मात्र, आमच्या तपासात हे स्पष्ट झालं आहे की, अल्पवयीन मुलगाच गाडी चालवत होता. अल्पवयीन मुलगा घरातून गाडी निघाल्यापासून ते अपघात व पोलिस ठाण्यात त्याला आणण्यापर्यंतचे सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. तसंच, मुलगा जेव्हा त्याच्या घरातून बाहेर निघाला तेव्हा त्याच्या सुरक्षारक्षकाच्या रजिस्टरमध्ये तो गाडी घेऊन निघाल्याची नोंद आहे. ज्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. 

अल्पवयीन मुलाला पिझ्झा, बर्गर देण्यात आला का?

अल्पवयीन मुलाला पिझ्झा बर्गर देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरही पोलीस आयुक्तांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पिझ्झा, बर्गर पार्टी झाली असं अद्याप  आमच्या चौकशीत काही समोर आलेले नाहीये. पण तरीही आम्ही घरातून एक एक व्यक्ती बाहेर पडला ते त्यानंतर अपघात आणि त्याच्यानंतर पोलिस ठाण्यात घेऊन जाईपर्यंतचे सीसीटिव्ही जप्त करण्यात आले आहेत. 

हेही वाचा :  Pune News :आयडीयाची कल्पना! ना लोडशेडिंग, ना लाईट बिलाचा त्रास... पुण्यातल्या 'या' गावात 24 तास उजेड

दोन ब्लड सॅम्पल घेतले

अल्पवयीन मुलाला अटक केल्यानंतर त्यावेळी पहिले ब्लड सकाळी 8वा घेतले होते. त्यानंतर पून्हा त्यानंतर पून्हा संध्याकाळी ब्लड घेतलं होते. कारण त्याच मुलाचे ब्लड आहे का हे कन्फर्म करण्यासाठी दोन वेळा घेतले होते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …